निलंगा : सामुहिक विवाह सोहळ्याचे पोस्टर लावण्यास एस.टी. चालकाने मनाई केल्याने निलंगा बसस्थानकात दहा ते बारा जणांच्या जमावाने चालकास मंगळवारी दुपारी ३.३० वा. बेदम मारहाण केली. दरम्यान, चालक, वाहकांनी एस.टी. सेवा बंद करून या घटनेचा निषेध केला. शिवाय, जोपर्यंत हल्लेखोरांना अटक केली जात नाही, तोपर्यंत एस.टी. सेवा बंद ठेवू, असा पवित्रा चालक, वाहकांनी घेतला. दुपारी ४.३० वाजेपासून बस सेवा बंद ठेवली.
पोस्टर लावण्यास विरोध; बसचालकास बेदम मारहाण
By admin | Updated: March 14, 2017 23:52 IST