जालना : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील हे २० मे रोजी जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येत असून यानिमित्त १८ मे रोजी जिल्हा काँगे्रसतर्फे पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली.माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस गोरंट्याल यांच्यासह माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.राधाकृष्ण विखे पाटील हे दौऱ्यामध्ये ते रोजगार हमी योजनेच्या कामास भेट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियास तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांना भेटी देणार आहेत. शेतकरी, शेतमजूर यांच्याशी संवाद साधून ग्रामीण भागातील समस्या ते जाणून घेणार आहेत. या भेटीनंतर दुपारी ३ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सतकर कॉम्प्लेक्समधील कार्यालयात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दुष्काळासंदर्भात चर्चा करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेऊन त्यासंदर्भात जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देणार आहेत.यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, सुरेश जेथलिया यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेते येणार दुष्काळी दौऱ्यावर
By admin | Updated: May 19, 2015 00:46 IST