शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीच्या कारवाईला औरंगाबादच्या व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:21 IST

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने सोमवारी दहा व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र, या कारवाईला मंगळवारी कपडा, मिठाई, बेन्टेक्स ज्वेलरी व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शविला.

ठळक मुद्देदुस-या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याचा संताप : आयुक्तांच्या आवाहनानंतर जमाव पांगला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने सोमवारी दहा व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र, या कारवाईला मंगळवारी कपडा, मिठाई, बेन्टेक्स ज्वेलरी व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शविला. उत्पादक कंपन्या आपला माल प्लास्टिक पॅकिंगमध्येच पाठवतात. त्यात व्यापाºयांचा काहीच दोष नाही, अशी भूमिका व्यापाºयांनी घेतली आहे.५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक बॅग आढळून आल्यास महापालिका पाच हजार रुपये दंड आकारत आहे. या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी थेट दुकानात घुसून कारवाईचा बडगा उगारत आहेत. दुकानात कॅरिबॅग असेल तर कारवाई करण्यात येत आहे. कंपन्यांनी पॅकिंग केलेले प्लास्टिकचे आवरण काढल्यास माल खराब होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी कपडा, मिठाई आणि बेन्टेक्स ज्वेलरी विक्रेत्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. काही साड्या कंपनीकडूनच प्लास्टिक आवरणासह पाठविण्यात येतात. ते प्लास्टिक आवरण काढताच येत नाही. काही मिठाईला पातळ कॅरिबॅग असते. मिठाई खराब होऊ नये, हा त्यामागचा हेतू असतो. बेन्टेक्स ज्वेलरीचाही असाच प्रकार आहे. दागिन्यांना चकाकी यावी म्हणून पॉलिश केलेली असते. पारदर्शक प्लॅस्टीकमध्ये पॅकिंग कंपनी करते. पॅकिंगमधून ज्वेलरी बाहेर काढल्यानंतर ती काळी पडण्यास सुरुवात होते.मनपाकडून कारवाईचे समर्थनराज्य शासनाने कारवाईचे निकष ठरवून दिले आहेत. कोणत्या कॅरिबॅगवर बंदी आहे, कोणत्या नाही, याची यादीच दिली आहे. त्यानुसार महापालिका कारवाई करीत आहे. यामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. काही उत्पादने त्यातून वगळावी, अशी विनंती व्यापाºयांनाच थेट शासनाकडे करावी लागेल, असे महापौरांनी नमूद केले.महावीर पाटणी पथकप्रमुखकॅरिबॅग बंदीसाठी महापालिकेने झोननिहाय पथक तयार केले आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून कालपर्यंत घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे काम पाहत होते. पदाधिकाºयांच्या आग्रहावरून मंगळवारी प्रशासनाने वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद