शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅपरेशन आॅल आऊट’चा धसका

By admin | Updated: January 28, 2017 23:44 IST

बीड : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या नागपूर पॅटर्नने अवैध धंदेवाल्यांना पळता भुई थोडी झाली

बीड : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या नागपूर पॅटर्नने अवैध धंदेवाल्यांना पळता भुई थोडी झाली आहे. मागील दहा दिवसांमध्ये जुगार व अवैध दारू विक्री विरोधात अनुक्रमे १३३ व २३३ असे मिळून ३६६ जणांना जेलची हवा खावी लागली आहे.नागपूरहून आलेल्या जी. श्रीधर यांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ ही नवीन मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत एकाचवेळी सर्व ठाण्यांमधील पोलीस कर्मचारी मध्यरात्री रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाते. आतापर्यंत दोनदा ही मोहीम राबविण्यात आली आहे. जुगार प्रकरणामध्ये १ लाख ६० हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू प्रकरणामध्ये ३ लाख ४४ हजार ८८२ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.अवैध धंद्यांसह बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवरही बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत दोन बेकायदेशीर पिस्टल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई झाली असून, अवैध वाहतुकीलाही चाप बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.सर्व ठाणेप्रमुखांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर सतर्क राहण्याच्या सूचना अधीक्षक श्रीधर यांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)