शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘स्वाराती’ रुग्णालयात ३५ वर्षानंतर ओपन हार्ट सर्जरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:26 IST

येथील स्वा.रा.ती. रुग्णालयातील सर्जरी विभागांतर्गत हृदयविकारावर शस्त्रक्रियेची ३५ वर्षांनंतर सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वा.रा.ती. रुग्णालयातील सर्जरी विभागांतर्गत हृदयविकारावर शस्त्रक्रियेची ३५ वर्षांनंतर सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी पार पडली.लातूर येथील हृदय शल्यचिकीत्सक डॉ.सयाजी सरगर यांच्यासह विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे, डॉ.सतिश गिरेबोईनवाड यांच्या सर्जन टीमने ही अवघड सर्जरी पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी भूलरोग तज्ञ म्हणून डॉ.गणेश निकम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. देवानंद पवार, डॉ. प्रसाद सुळे आदींनीही योगदान दिले.इफ्तेखार मणियार (वय २२ वर्ष, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) या गरीब परिस्थितीतील युवकावर जन्मत: हृदयविकार असलेला ‘पेटन्ट डक्टस् आर्टेरियस’ नामक आजारावर उपचाराचा भाग म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्मत: हा आजार होतो. परंतु बालवयात शस्त्रक्रियेअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने तरुणांमध्ये हा आजार आढळणे वैद्यकीयदृष्ट्या अतिशय दुर्मिळ बाब आहे.पस्तीस वर्षांमध्ये प्रथमच झालेली सदरील दुर्मिळ प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही मोठी आनंददायक घटना असून हृदयावरील याहून मोठ्या बायपाससारख्या शस्त्रक्रियांसाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केला.स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही ओपन हार्ट सर्जरी ऐतिहासिक आहे, या शब्दांत रुग्णालयाच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षा खा. डॉ.प्रितम मुंडे यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे तसेच हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.सयाजी सरगर यांचे कौतूक केले आहे. सदरील रुग्ण इफ्तीकार वरील ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्याची तब्येत वेगाने सुधारत आहे.अंबाजोगाईतील स्वाराती ग्रामीण रुग्णालयाला ६० वर्षे झाली आहेत. तर स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास ३५ वर्षे झाली. यंत्रणा तोकडी असल्याने मोठ्या व गंभीर शस्त्रक्रिया होण्यास सुविधांसह मानसिक धैर्य कमी पडत होते.अलिकडच्या काही वर्षात सुविधा उपलब्ध झाल्याने इथेच शिक्षण घेतलेले डॉ. नितीन चाटे यांनी ओपन हार्ट सर्जरीचे धाडस केले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी संपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

टॅग्स :BeedबीडHeart Attackहृदयविकाराचा झटकाhospitalहॉस्पिटलAmbajogaiअंबाजोगाई