शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

स्वच्छतेच्या फक्त तोंडी सूचना

By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST

बीड : जिल्ह्यातील सर्वच बस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचा त्रास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छतेसंदर्भात वरीष्ठांकडे तक्रारी केल्या

बीड : जिल्ह्यातील सर्वच बस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचा त्रास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छतेसंदर्भात वरीष्ठांकडे तक्रारी केल्या तर केवळ सुचना देण्याचे काम ते करतात, प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा विभागीय कार्यालयात अनुभवयास मिळाला.कर्तव्यावरून आल्यानंतर चालक, वाहक यांना आराम करता यावा, या उद्देशाने स्थानकात विश्रांतीगृह बांधण्यात आले. मात्र येथे राहणे म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विश्रांतीगृहातील समस्यांबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे दुर्गंधीचा सामना करीत खुराड्यात रहावे लागते, यावर प्रकाश टाकला होता. याची दखल घेत प्रभारी विभागीय नियंत्रक आर.एन. बनसोडे यांनी स्थानकप्रमुखाला स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. बनसोडे यांच्यासाठी या सूचना जरी नव्या असल्या तरी स्थानकप्रमुखांसाठी ही सवय होऊन गेली आहेत. (प्रतिनिधी)विभागीय कार्यालयाकडून स्वच्छता करावी, यासंदर्भात नोटीस पाठविली जाते, मात्र या नोटीसला केराची टोपली दाखविण्याचे काम स्थानकप्रमुख करतात. असे असताना देखील वरीष्ठ अधिकारी मुग गिळून गप्पच असतात.वरीष्ठ अधिकारी केवळ नोटीस देवून संबंधीत अधिकाऱ्यांची बोळवण करतात, प्रत्यक्षात काम झाले की नाही, हे पाहण्यासाठी मात्र त्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे.४वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच इतर कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप केला जात आहे.४कामगार संघटना डझनभर असून सुध्दा कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आवाज उठविण्यासाठी तयार नाही.