शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळात करश्रेणी कमी झाली तरच, जीएसटीची वसुली अधिक वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:43 IST

भविष्यात दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी जीएसटीच्या तीनच श्रेणी असतील

ठळक मुद्दे पेट्रोल-डिझेलचाही समावेश करण्याची मागणी 

औरंगाबाद : येत्या काळात बहुतांश वस्तूंवर १२ ते १८ टक्क्यांदरम्यान जीएसटी आकारला जाईल. भविष्यात दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी जीएसटीच्या तीनच श्रेणी असतील, असे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत.

शहरातील व्यापारी संघटनांचीही जीएसटी लागू होण्याच्या आधीपासूनची मागणी यानिमित्ताने पूर्ण होताना दिसत आहे. करश्रेणी कमी झाली तरच जीएसटीची वसुली अधिक वाढेल, तसेच पेट्रोल-डिझेलचा समावेशही त्यात करण्यात यावा, अशी मागणीही येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. जीएसटी लागू होऊन १८ महिने होत असून, आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करश्रेणी कमी करण्याचे संकेत दिल्याने उशिरा का होईना जीएसटी परिषदेला जाग आली, असे म्हणत व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. 

संघटनेने केला होता पाठपुरावा मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, एक देश एक प्रणाली असे सांगत जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात पाच करश्रेणी लागू करण्यात आल्या. त्याच वेळी संघटनेने आक्षेप घेतला होता. दोन किंवा तीन करश्रेणी असाव्यात हीच आमची मागणी होती. त्यासाठी खासदारांपासून ते जीएसटी परिषदेपर्यंत आम्ही सतत पाठपुरावा केला. आता अर्थमंत्र्यांनी ते मान्य केले आहे. कारण जेवढा कर कमी तेवढी करवसुली जास्त हे आजपर्यंतचा इतिहास आहे. २८ टक्क्यांमध्ये फक्त बीअर, दारू, महागड्या गाड्या, ५० इंचापेक्षा अधिकचे टीव्ही यांचा समावेश करावा. बाकीच्या वस्तू तीन श्रेणीत ठेवाव्यात, अशी आमची मागणी आहे. 

पेट्रोल, डिझेल जीएसटीत आणावे जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, जीएसटीत दोनच श्रेणी असाव्यात ही आमची मागणी होती आणि अजूनही आहे. खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला महागाईवर नियंत्रण मिळवायचे असेल व जीएसटीची वसुली वाढवायची असेल तर सर्वप्रथम पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीत करावा, यामुळे भरमसाठ आकारले जाणारे कर कमी होऊन सर्वसामान्यांना पेट्रोल स्वस्त मिळेल व डिझेलचे भाव कमी झाल्याने मालवाहतूक दर कमी होतील. कर वसुलीचे प्रमाण दुपटीने वाढेल. तसेच २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्यासाठी सिमेंटचे दर २८ हून १८ टक्क्यांवर आणावे, ही आमची मागणी आहे. करश्रेणी कमी करण्याचा विचार अर्थमंत्री करतात  याचा आनंदच होय. 

तर सर्वसामान्यांना फायदा होईलआजघडीला जीएसटीत २८ टक्क्यांच्या करश्रेणीत २८ वस्तू शिल्लक राहिल्या आहेत. येत्या काळात करश्रेणी कमी करण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. वस्तूंवरील कर कमी झाले तर तेवढ्या प्रमाणात वस्तूंच्या किमती कमी होतील. याचा सर्वसामान्यांनाच फायदा होईल. त्यासाठी कंपन्यांनीही त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी प्रामाणिकता दाखविली पाहिजे. तसेच कमी करश्रेणीमुळे व्यापाऱ्यांना हिशोब ठेवण्यास सोपे जाईल. सीएना जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यास तुलनात्मकदृष्ट्या सोपे जाईल. - सीए रोहन आचलिया

टॅग्स :GSTजीएसटीfundsनिधीbusinessव्यवसाय