शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचे पुनर्लेखन हा एकमेव अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:54 IST

भारताच्या इतिहासात ज्यांनी राष्ट्रध्वजातील रंगांवर आक्षेप घेतला. राष्ट्रगीताला विरोध केला, असे लोक आता त्याच्या सक्तीसाठी आग्रही आहेत. चित्रपटगृहात कोणी उभे राहिले नाही, तर त्याला देशद्रोही ठरवत आहेत. या लोकांचा भारताच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केली.

ठळक मुद्देऔरंगाबादेत एसएफआय संमेलन : पी.साईनाथ यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारताच्या इतिहासात ज्यांनी राष्ट्रध्वजातील रंगांवर आक्षेप घेतला. राष्ट्रगीताला विरोध केला, असे लोक आता त्याच्या सक्तीसाठी आग्रही आहेत. चित्रपटगृहात कोणी उभे राहिले नाही, तर त्याला देशद्रोही ठरवत आहेत. या लोकांचा भारताच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केली.स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियातर्फे विद्यापीठातील नाट्यगृहात २ ºया राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन पी. साईनाथ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एसएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव होते. तर एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, राष्ट्रीय सचिव विक्रमसिंग, स्वागताध्यक्ष भगवान भोजणे, राज्य सचिव बालाजी कलेटवाड, मंजूश्री कबाडे, रोहिदास जाधव, अ‍ॅड. सुनील राठोड यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पी. साईनाथ यांनी केंद्र सरकारवर परखड टीका केली. रवींद्रनाथ टागोर यांनी आदिवासी भागात जाऊन कृषी महाविद्यालय उभारले. पुढे हे शांतीनिकेतन झाले. त्याला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. सध्याच्या कुलगुरूंनी लालसेपोटी विद्यापीठात चक्क गोशाळा उघडली आहे. यासाठी कारण दिले की, रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा दुधासाठी गायी पाळायचे. त्याचे गोशाळा हे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०० गायींची खरेदी करण्यात येत आहे. यातील ४० मिळाल्या आहेत. कर्मचारी, ठेकेदारांना देण्यासाठी पैसा नाही. तेथे गायी आणल्या जात आहेत. सीएसआरच्या फंडातूनही गोशाळा उभारण्यात येत आहेत, हे धोकादायक आहे. आपले पंतप्रधान कार्यालय रोहित वेमुला हा दलित नव्हता हे सिद्ध करण्यासाठी हस्तक्षेप करते, यावरून देश कोणत्या दिशेने जात आहे हे लक्षात येत असल्याचेही साईनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकाळात उद्योगपतींना फायदा पोहोचविण्याचा वेग कमी होता. मात्र, विद्यमान सरकार उद्योगपतींसाठीच कार्य करते. पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीसाठी वापरण्यात येतो. यातच सर्व काही आले. विक्रमसिंग, भगवान भोजणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अ‍ॅड. सुनील राठोड यांनी केले.