शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

फक्त २ लाख वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:43 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली

स.सो. खंडाळकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली. मराठवाड्यातील ४० लाख शालेय मुला-मुलींनी प्रत्येकी एक झाड या हिशेबाने ४० लाख झाडे लावावीत, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या संख्येकडून १ लाख ९० हजार एवढी कमी झाडे लावली गेली. ही एक शोकांतिकाच मानली जात आहे, हीच गत जलसंपदा विभागाची झाली. कालव्याच्या बाजूने वा अन्यत्र फार मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची अपेक्षा असताना जलसंपदा विभागाने मात्र वृक्ष लागवडीकडे पाठ फिरविली. त्यांना झाडे लावण्याचा कार्यक्रम अजिबात महत्त्वाचा वाटला नाही.आता आव्हान उभे ठाकणार आहे, ते लावलेली झाडे जगवण्याचे! सुमारे ५० ते ६० टक्के झाडे वन विभाग व सामाजिक वनीकरणाने जगवावीत, हे गृहीतच आहे. याशिवाय वृक्षसंवर्धनासाठीच पुढे आलेल्या ग्रीन आर्मीच्या १२ लाख १३ हजार सदस्यांकडून वृक्षसंवर्धन केले जाईल. मनरेगामधूनही ही झाडे जगवली जाणार आहेत. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांनी संवर्धनाची काळजी घ्यावी, असे अपेक्षित आहे.मराठवाड्यात मुळातच ४.८३ टक्के एवढे वनक्षेत्र आहे. ते वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागलेले दिसले. यासाठी स्वत: विभागीय आयुक्त मराठवाडाभर फिरले. कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. मोटिव्हेशन वाढवले.शिक्षण विभागासाठीही औरंगाबादेत कार्यशाळा घेतली; पण शिक्षण विभागाने वृक्षलागवडीत अजिबात रुची दाखवली नाही. ‘आमची शाळा... आमची टेकडी...’ अशा सुंदर कल्पनेलाही शाळांनी दाद दिली नाही. मराठवाड्यात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी दोनशे टक्के श्रम करावे लागतात. अन्य विभागात शंभर टक्के श्रम केल्यास दोनशे टक्के यश मिळत असते, याचा प्रत्यय या वृक्षलागवड कार्यक्रमाने दिला. तरीही मराठवाड्याने १३९ टक्केवृक्षलागवड केल्याने अभिनंदन होत आहे.