औरंगाबाद : मनोरंजनासह बौद्धिक आनंदाचाही खजिना उपलब्ध करून देणाऱ्या लोकमत सखी मंचसाठी नोंदणी करण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. लवकरात लवकर नोंदणी केल्यास अनोख्या कार्यक्रमांसह अनेक हमखास भेटवस्तू व सुविधांचाही महिलांना आनंद घेता येणार आहे. लोकमत सखी मंचचे सदस्यत्व अवघे चारशे रुपये भरून घेता येणार आहे. यात सदस्य झाल्यानंतर वर्षभर आकर्षक कार्यक्रमांसह हमखास भेटवस्तू मिळतील. यात ५०० रुपयांचा मोफत ३ कढ्यांचा सेट, ११०० रुपयांच्या सुवर्ण स्पर्शच्या २ बांगड्या, मोफत थाळी, पावभाजी, मंगळसूत्र, कर्णफुले, लोणचे व मिरची ठेचा, हेअर कट, हेअर पॅक या हमखास मोफत भेटवस्तूंसह १ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, लकी ड्रॉ यांचाही लाभ घेता येणार आहे. २०१५ या वर्षात किमान १२ अभिनव कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. यासह फेब्रुवारी महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सदस्यांच्या कूपनची मुदत वाढवण्यात येणार आहे. येत्या काळात रांगोळी व मेंदी स्पर्धांचे विभागवार आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी सखी मंचचे सदस्य होणे आवश्यक आहे.
सखी मंच नोंदणीचे अवघे २ दिवस शिल्लक
By admin | Updated: February 14, 2015 00:12 IST