औरंगाबाद : रविवारी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या स्टाईलने ‘आॅनलाईन’ प्रश्नपत्रिका फोडून पेपर सोडविणाऱ्या टोळीचा सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. वर्धा येथे परीक्षा देणाऱ्या आपल्या साथीदाराला हे आरोपी औरंगाबादेत बसून उत्तरे सांगत होते.या टोळीतील परीक्षार्थी विठ्ठल धनसिंग घोलवाल (२३, रा. हसनाबादवाडी, ता. औरंगाबाद) याच्यासह संदीप धनसिंग घोलवाल (२०, हसनाबादवाडी), लखनसिंग देवीचंद देडवाल (२०, रा. हसनाबादवाडी), अनिल ऊर्फ अरुण केसरसिंग जोनवाल (२४, रा. लांडकवाडी, ता. औरंगाबाद) व घाटी रुग्णालयातील कारकून मदन बमनाथ या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात कारकून असलेल्या आरोपी मदनने २६ आॅगस्ट रोजी तेथील डॉ. विकास राठोड यांचा लॅपटॉप नेला. ‘माझ्या मुलीला शाळेचा प्रोजेक्ट बनवून द्यायचा आहे, त्यासाठी लॅपटॉप हवा आहे’ अशी त्याने थाप मारली. २८ आॅगस्ट रोजी मदनने सायंकाळी लॅपटॉप आणून दिला. लॅपटॉपवर प्रश्नपत्रिका पाहून आला संशयमदनने लॅपटॉप परत आणून दिल्यानंतर डॉ. राठोड यांनी लॅपटॉप सुरू केला आणि (पान ५ वर)यातील आरोपी विठ्ठल, अनिल, लखनसिंग, संदीप हे चौघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. हडकोतील नवजीवन कॉलनीत ते चौघे गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होते. यातील विठ्ठल हा रविवारी झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेला बसला होता. वर्ध्यातील परीक्षा केंद्रावर त्याचा नंबर लागला होता. ४हे सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. विठ्ठलला पास करण्यासाठी सर्वांनी मिळून गाजलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपट स्टाईलचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरोपी मदनने मग डॉ. राठोड यांच्याकडून उसना लॅपटॉप आणला, तर आरोपी अनिल जोनवालने ब्ल्यू ट्यूथ व इतर साहित्याची जुळवाजुळव केली. मग ठरल्याप्रमाणे आरोपी विठ्ठल हा परीक्षा देण्यासाठी वर्धा येथे गेला. रविवारी परीक्षा केंद्रात बसल्यानंतर प्रश्नपत्रिका हाती मिळताच त्याने स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने छायाचित्र काढून ते इकडे औरंगाबादेत बसलेल्या आपल्या मित्रांना मेलवर पाठविले. प्रश्नपत्रिका मिळताच हडकोतील नवजीवन कॉलनीत अनिल, लखनसिंग, संदीप व मदनने गाईड, पुस्तकात पाहून वर्धा परीक्षा केंद्रात बसलेल्या विठ्ठलला उत्तरे सांगण्यास सुरुवात केली. आरोपींनी सगळीच्या सगळी उत्तरे त्याला ब्ल्यू ट्यूथने कळविली, अशा पद्धतीने आरोपींनी प्रश्नपत्रिका फोडून कॉपी केल्याचे सायबरच्या तपासात स्पष्ट झाले.
आॅनलाईन फोडला एमपीएससीचा पेपर
By admin | Updated: August 31, 2016 00:43 IST