शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन पीजी सीईटी होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:53 IST

अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा विरोध झुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आॅनलाईन पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा (पीजी-सीईटी) घेणार आहे. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील विभागप्रमुख आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या १०६ महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान आॅनलाईन पीजी-सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्दे१५ एप्रिलपासून परीक्षा : कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा विरोध झुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आॅनलाईन पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा (पीजी-सीईटी) घेणार आहे. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठातील विभागप्रमुख आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या १०६ महाविद्यालयांतील प्राचार्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान आॅनलाईन पीजी-सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, समाजशास्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय साळुंके आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी हेदखील हजर होते. बैठकीत विषयनिहाय आॅनलाईन सीईटीसाठी कुलगुरूंच्या अध्यक्षेतखाली अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि प्राचार्यांची संयुक्त समिती तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दहा प्राचार्य, दहा विभागप्रमुख आणि चार अधिष्ठाता असा २४ जणांचा समावेश असेल. सदस्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात येतील. डॉ. सरवदे पीजी-सीईटीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.गेल्या वर्षीप्रमाणे आॅफलाईन पीजी-सीईटी घेण्याऐवजी विद्यापीठाने यंदा पीजी-सीईटी आॅनलाईन पद्धतीने घेण्यावर जोर दिला. सदरील बैठकीत ग्रामीण भागातील महाविद्यालयातील प्राचार्यांनी पीजी-सीईटीला तीव्रपणे विरोध केला. आधीच ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्येचा पदव्युत्तर पदवीतील टक्का घसरत आहे. त्यातही प्रवेशपूर्व परीक्षेमुळे अनेकांनी पाठ फिरवली असल्याची कारणे या प्राचार्यांनी समोर केली.पदवी परीक्षेनंतर गावी जाणाºया विद्यार्थ्यांना मे-जूनमध्ये पीजी-साईटी देण्यासाठी पुन्हा शहरात येण्यास अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्यामुळे पीजी-सीईटी ही अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेनंतर लगेच घेण्यात यावी, असा प्रस्ताव मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी मांडला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १५ एप्रिल ते १ मे दरम्यान विविध विषयांच्या प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चार जिल्ह्यांमध्ये दहा समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येतील.यंदा सामायिक नाही तर विषयनिहाय सीईटीयंदा सामायिक पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, विषयनिहाय सीईटी घेतली जाणार आहे. २० फेबु्रवारीपासून नोंदणीस प्रारंभ होणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी दोनशे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. केवळ या सीईटीतील गुणांच्या आधारेच पदव्युत्तर पदवीला प्रवेश देण्यात येणार असून, स्पॉट अ‍ॅडमिशनसाठी स्वतंत्र नियमावली असेल.