शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आॅनलाईन लॉटरीचा झाला गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:19 IST

काही मिनिटांत श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत अनेक जण लॉटरीची तिकिटे खरेदी करतात. त्यात काहींचे स्वप्न पूर्ण होते, तर काही जण प्रयत्न करीत राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : काही मिनिटांत श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत अनेक जण लॉटरीची तिकिटे खरेदी करतात. त्यात काहींचे स्वप्न पूर्ण होते, तर काही जण प्रयत्न करीत राहतात. अशाच आशावादी लोकांच्या जिवावर शहरात आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय बहरला होता. यातून दररोज ५० लाखांपेक्षा अधिक उलाढाल होत असे; पण संपूर्ण लॉटरीच्या रकमेवर २८ टक्के जीएसटी लागल्याने नशीब अजमावणाºयांनी पाठ फिरविली. परिणामी उलाढाल ५ लाखांच्या खाली आली आहे. मागील ६ महिन्यांत शहरातील जवळपास ४०० लॉटरी सेंटर बंद पडली आहेत. यामुळे आॅनलाईन लॉटरीचा खेळखंडोबा झाला आहे.लॉटरी खेळणे चांगले का वाईट हा वादाचा विषय आहे. मात्र, सरकारमान्य अधिकृत व्यवसायात लॉटरीचा समावेश होतो. राज्यामध्ये मटका, जुगारासारखे अवैध धंदे बोकाळले होते. त्याला लगाम घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने राज्यात शासकीय लॉटरी १९६७ मध्ये सुरू केली. २००३ पासून राज्यामध्ये आॅनलाईन तिकीट विक्री सुरू झाली. ही विक्री इतर राज्यांमार्फत महाराष्ट्रात जोमात सुरू झाली. यात गोवा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल, नागालँड या पाच राज्यांतील आॅनलाईन लॉटरीचे दररोज दिवसभरात ८२ ड्रॉ काढण्यात येऊ लागले. जीएसटीपूर्वी लॉटरीच्या किमतीतून बक्षिसांची रक्कम वजा करून जी रक्कम उरत त्यावर कर लावण्यात येत असे. मात्र, १ जुलैपासून जीएसटी लागू झाला आणि तिकिटांच्या संपूर्ण रकमेवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येऊ लागला. यामुळे जीएसटीची तेवढी रक्कम बक्षिसातून वजा करण्यात आली. परिणामी, ग्राहकांचे आॅनलाईन लॉटरीचे आकर्षण कमी झाले.उलाढाल घटल्याने दुकानाचे भाडेही निघेना झाल्यामुळे एकानंतर एक लॉटरी सेंटर बंद पडू लागले. मागील सहा महिन्यांत शहरातील जवळपास ४०० आॅनलाईन लॉटरी सेंटर बंद पडले. आजघडीला शहरात २०० सेंटर सुरू आहेत. जिथे दैनंदिन ५० लाखांची उलाढाल होत असे तिथे आजघडीला ५ लाखांपेक्षा कमी उलाढाल येऊन ठेपली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास खंडेलवाल यांनी दिली.२ हजार कॉम्प्युटर वितरकांच्या गोदामात जमाआॅनलाईन लॉटरीचे वितरण कंपनीच्या मुख्य अधिकाºयांनी सांगितले की, मागील ६ महिन्यांत आॅनलाईन लॉटरीचे सेंटर बंद होत आहेत. यामुळे आमच्या कंपनीकडून देण्यात आलेल्या कॉम्प्युटरपैकी २ हजार कॉम्प्युटर विक्रेत्यांनी परत आणून दिले आहेत. तसेच बॅटºयाही आल्या आहेत. याशिवाय येथील सर्व्हिस सेंटरमधून २० अभियंत्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.जीएसटीला विक्रेत्यांचा विरोध नाहीमहाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास खंडेलवाल यांनी स्पष्ट केले की, जीएसटी २८ टक्के देण्यास लॉटरी विक्रेत्यांचा विरोध नाही. मात्र, १०० रुपयांचे तिकीट असेल तर त्यातील ९० रुपयांचे बक्षिसाची रक्कम जाता उर्वरित १० रुपयांवर जीएसटी आकारावा, अशी आमची भूमिका आहे. शिल्लक १० रुपयांत ३.५० रुपये विक्रेत्याला मिळतात. १ रुपया ठोक विक्रेत्याला, २ रुपये अन्य खर्च, २ रुपये मुख्य वितरकाला, तर उर्वरित २ रुपये पूर्वी रॉयल्टी व अन्य कर रुपात सरकारच्या तिजोरीत जमा होत. आता १०० रुपयांच्या तिकिटावरच २८ टक्के जीएसटी आकारण्यात येत असल्याने बक्षिसाची रक्कम घटली व ग्राहकांनी पाठ फिरविली.