शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आॅनलाईन तक्रारीत जिल्हाधिकारी कार्यालय टॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:04 IST

औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या.

औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या. प्रशासन नावाचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात उरला नसल्यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा मिळणे अवघड झाल्याचा हा पुरावा आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ८२३ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ४०० तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात होत्या. सरकार दरबारी केलेल्या तक्रारींची वेळेत दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला होता. लालफितीचे चटके सहन करून थकलेल्या सामान्य नागरिकाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांची आर्थिककुवत जेमतेम आहे. त्यांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. हे पारंपरिक चित्र बदलण्यासाठी लोकांनी केलेल्या तक्रारींची थेट सरकार दरबारी दखल घेण्यासाठी शासनाने सुरूकेलेले ‘आपले सरकार’ हे आॅनलाईन पोर्टल लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांबाबतीत तक्रारींचा वर्षाव सुरू झाला आहे. राज्य शासनाने १५ आॅगस्ट २०१५ पासून हे पोर्टल सुरू केले. त्यावर आतापर्यंत जिल्ह्यातून विविध खात्यांच्या संदर्भातील ७६३ लोकांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी ६४० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात ३१३ तक्रारी आल्या. त्यातील २६१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. आॅनलाईन तक्रार नोंदविता येते. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात असलेल्या तक्रारी प्रथम निवासी उपजिल्हाधिकारी हाताळतात.‘आपले सरकार’च्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे देण्याचीही सोय आहे. नागरिक इंटरनेटवरून अर्ज करू शकतात. लोकांनी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी केले आहे.