शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

डेंग्यूचा पुन्हा एक बळी

By admin | Updated: September 20, 2016 00:23 IST

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता.

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. यानंतरही डेंग्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस शहराभोवती डेंग्यूचा विळखा वाढत असून, या आजाराने एका युवतीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली.शेख सादिया फारुक (१८, रा. देवळाई, मूळ रा. नायगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रकृती खालावल्यामुळे १७ सप्टेंबर रोजी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूमुळे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे १८ सप्टेंबर रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. जिल्हा हिवताप कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात डेंग्यूचा उद्रेक अधिक आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्याठिकाणी हे शक्य होत नाही, त्याठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराचा कहर पाहता मनपा आणि आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. सातारा, देवळाई, पुंडलिकनगर, लेबर कॉलनी, गारखेड्यासह विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठी आहे.प्रकृती गंभीररुग्ण ज्यावेळी दाखल झाला, तेव्हा प्रकृती गंभीर होती. तरीही डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. रुग्णाचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला, अशी माहिती कमलनयन बजाज रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्यंकट होळसांबरे यांनी दिली.डेंग्यूने शहरात कोणाचाही मृत्यू नाही- महापालिकेचा दावाशहरातील १६६ वसाहतींमध्ये डेंग्यूने थैमान घातले असून, आतापर्यंत सहापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूशी झुंज देत आहेत. महापालिका प्रशासन दरवर्षीप्रमाणे एकाही रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला नसल्याचा खळबळजनक दावा करीत आहे.४ डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळत जनजागृतीवर अधिक भर देत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. ४पंधरा दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाचवर्षीय चिमुकली माहिम सुलताना मीर आसिफ अली हिचा मृत्यू झाला. शिवाजीनगर येथील अवघ्या एकवर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूने मृत्यू झाला. सोमवारी सातारा-देवळाई परिसरातील १७ वर्षीय शेख सादिया या युवतीचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये डेंग्यूने शहरात ६ जणांचा मृत्यू झालेला असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा करीत आहे. जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक नाही. डेंग्यूमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. विषाणूजन्य तापामुळे मृत्यू झाले आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.