शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावर महिला, पुरुषांसाठी स्वच्छतागृह एकच तेही कुलुपबंद; कुचंबणा कशी टाळणार?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 18, 2023 13:45 IST

पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी, टायर ट्यूबमध्ये हवा मोफत; जाणून घ्या आणखी कोणत्या सुविधा असाव्यात

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोलपंपावर वाहनधारकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, तिथे टायर ट्यूबमध्ये मोफत हवा भरण्यात यावी, एवढेच नव्हे तर स्वच्छतागृह तिथे असलेच पाहिजे, असा करारच तेल कंपनी व पेट्रोलपंपचालकांमध्ये झालेला असतो. पंपावर पाणी व मोफत हवा भरण्याची व्यवस्था दिसून आली; पण महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा अभाव दिसून आला. दोघांसाठी एकच स्वच्छतागृह व तेही कुलूप बंद होते. यामुळे अनेकदा ग्राहकांची विशेषत: महिलांची यामुळे कुचंबणा होताना दिसून येत आहे.

या सुविधा पंपावर हव्याचपेट्रोलपंप म्हणजे नुसती पेट्रोल व डिझेल भरण्यापुरती सेवा मर्यादित नाही.१) ग्राहकांना येथे मापात माप न करता पेट्रोल- डिझेल मिळाले पाहिजे.२) ग्राहक कॅश पेमेंट करो वा ऑनलाइन ते स्विकारले पाहिजे.३) स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था असलीच पाहिजे.४) वाहनाच्या टायरट्यूबमध्ये मोफत हवा भरण्याची सुविधा असावी.५) स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह स्वतंत्र व स्वच्छ असावे.६) प्रथमोपचाराची सुविधाही दर्शनी भागात ठेवण्यात यावी.७) पेट्रोल, डिझेलच्या गुणवत्तेवर ग्राहकाला संशय आल्यास तपासणीकरिता फिल्टर पेपर टेस्टची मोफत व्यवस्था पंपावर असलीच पाहिजे.

या पेट्रोलपंपावर ‘लोकमत’ने काय पाहिले?पेट्रोल पंप : क्रांतीचौकपाणी : पाण्याची व्यवस्था; पण पाठीमागील बाजूस.वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा होती.स्वच्छतागृह : स्वच्छतागृह आहे; पण महिला, पुरुषांसाठी एकच.-----------पेट्रोल पंप : काल्डा कॉर्नर रस्तापाणी : व्यवस्था आहे; पण ग्राहक वापरत नव्हते.वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा आहे.स्वच्छतागृह : महिला- पुरुषांसाठी एकच स्वच्छतागृह, त्यास कुलूप.-------------पेट्रोल पंप : टीव्ही सेंटर परिसरपाणी : व्यवस्था आहे.वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा आहे.स्वच्छतागृह : एकच स्वच्छतागृह-----------पेट्रोलपंप : शहागंज परिसरपाणी : व्यवस्था नाही.वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा नाहीस्वच्छतागृह : नाही---------------पेट्रोल पंप : बीड बायपासपाणी : व्यवस्था आहे.वाहनांसाठी मोफत हवा : सुविधा आहे.स्वच्छतागृह : एकच स्वच्छतागृह तेही कुलूप बंद

जिल्हाधिकाऱ्यांना असतात कारवाईचे अधिकारतेल कंपन्या व पेट्रोलपंपचालकांमध्ये जो करार होतो, त्यातच ग्राहकांना मूलभूत सुविधांचा उल्लेख केलेला असतो. नुसते वाहनधारकच नव्हे, तर इतर नागरिकांनाही सुविधा मिळावी. नियमानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सुविधा मिळतात की, नाही याची तपासणी करणे आवश्यक असते. जर पंपावर मूलभूत सुविधा दिली जात नसेल तर ग्राहकांना यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार करण्याचे अधिकार आहेत. मात्र, या अधिकाराचा वापर ग्राहक करत नाही, कारण कायदे, नियमांबद्दल जागृती नसणे हेच मुख्य कारण आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपAurangabadऔरंगाबाद