शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

' गोल्याचा केला गेम' ; औरंगाबादेत एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:37 IST

जयसिंगपुरा येथे राहणाऱ्या अजय तिडके या युवकाची त्याच्याच मित्राने एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान उघडकीस आले.

ठळक मुद्देअजय तिडके उर्फ गोल्या व आरोपी मंगेश वायव्हळ हे मित्र असून दूरचे नातेवाईक पण आहेत. अजयचे त्यांच्याच नात्यामधील एका मुलीशी प्रेमप्रकरण होते.

औरंगाबाद : जयसिंगपुरा येथे राहणाऱ्या अजय तिडके या युवकाची त्याच्याच मित्राने एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान उघडकीस आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृताच्या रूममेटला," गोल्याचा केला गेम " असे म्हणत तेथून थेट बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले. 

या प्रकरणी पोलिसांनी अजयचा मित्र मंगेश वायव्ह्ळ याला अटक केली आहे. या बाबत बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय तिडके उर्फ गोल्या व आरोपी मंगेश वायव्हळ हे मित्र असून दूरचे नातेवाईक पण आहेत. अजयचे त्यांच्याच नात्यामधील एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. यासोबतच ती मुलगी आरोपी मंगेश याच्याशीसुद्धा बोलत असे. मंगेशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. यामुळे अजय व त्या मुलीचे प्रेमप्रकरण त्याला मान्य नव्हते. यातूनच मंगेशने अजयला संपवण्याचा कट रचला. यानुसार तो काल पुण्याहून औरंगाबादला आला आणि रात्री उशिरा अजयच्या रामेश्वर अपार्टमेंटमधील फ्लॅटवर गेला. 

पट्ट्याने आवळला गळा फ्लॅटवर  येताच मंगेशने अजयच्या रूममेटला मला याच्याशी काही खाजगी बोलयाचे आहे तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जा असे सांगितले. यानंतर रात्री चार ते पाच वाजेच्या दरम्यान त्याने आधीच सोबत आणलेल्या पट्ट्याने अजयचा गळा आवळला. अजय मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तब्बल दोन तास तो तिथेच बसून राहिला.

'गोल्याचा केला गेम' सकाळी सहा वाजता मंगेश रुमच्या बाहेर आला. यावेळी बाहेर अजयचे रुममेट अभ्यास करत होते. त्यांना, 'गोल्याचा केला गेम' असे म्हणत तो तेथून बाहेर पडला. यावेळी अजयच्या रूममेटला तो गंमत करत असल्याचे वाटले. मात्र काही वेळाने अजयची हत्या झाल्याचे त्यांच्या उघडकीस आले. यानंतर मंगेशने थेट बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठले व आत्मसमर्पण केले. शहरात पंधरा दिवसापूर्वीच संकेत कुलकर्णी याची एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आज ही दुसरी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.