मुखेड : तालुक्यातील जांब बु़ येथील एका शिक्षकाचे प्लॉट जुन्या मालकाने खोटे दस्तावेज तयार करून तिघांना विक्री केल्याची घटना घडली असून फिर्यादी शिक्षकाने दाखल केलेल्या याचिकेच्या आधारावर न्यायालयाने आरोपीसह इतर सात जणांंविरूद्ध मुखेड पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असता मुखेड पोलिसांनी आरोपीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ याबाबतची माहिती अशी की, जांब येथे माधव दिगंबर शिंदे यांची गट क्ऱ४३७ मध्ये जमीन आहे़ यातील प्लॉट क्ऱ५ व ६ हे दोन भूखंड शिंदे यांनी २००४ रोजी ५० हजार रुपये दराने रमेश काशीनाथ धनुरे यांना विक्री केले व सदर प्लॉट धनुरे यांच्या नावे रितसर करून दिले़ धनुरे यांनी शिंदे यांच्याकडून विक्री केलेले प्लॉट सन २००७ मध्ये (प्लॉट क्ऱ५) बालाजी गोविंदराव राऊतवाड यांना विक्री केले़ राऊतवाड यांनी धनुरे यांच्याकडून खरेदी केलेले भूखंड क्षेत्रफळ १३०० चौफ़ुट रितसर खरेदीखत करून ग्रामपंचायतमध्ये स्वत:च्या नावे लावले़ ग्रामपंचायतने गट क्ऱ४३७ मधील प्लॉट क्ऱ५ हा बालाजी राऊतवाड यांचे नावे लावून त्यांना घर क्ऱ१०२० असा दिला असताना पूर्वाश्रमीचे भूखंड मालक माधव शिंदे यांनी जुन्या कागदपत्राअधारे व भूखंडाचे चुकीचे क्षेत्रफळ दाखवून प्लॉट क्ऱ५ मधील २० बाय ३२ चौफ़ुट जमीन दि़१जुलै २०१३ रोजी जांब येथील खैरुनिसा बेगम अब्दुल रज्जाक यांना विक्री केली तसेच यातील १० बाय ३२ चौफ़ुट जमीन ८ जानेवारी २०१४ रोजी हणमंत शंकर ताटफळे यांना विक्री केली व मुखेडच्या उपनिबंधक कार्यालयात खोट्या दस्तावेजाद्वारे खरेदीखत करून दिले़ ही बाब मुळमालक राऊलवाड यांच्या लक्षात आल्यानंतर राऊलवाड यांनी शिंदे यांनी खोट्या दस्तावेजाद्वारे माझ्या मालकीचे प्लॉट विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार मुखेड पोलिसात दाखल केली होती़ पण मुखेड पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने या प्रकरणातील प्लॉटचे दस्तावेज व पुरावे तपासून आरोपी माधव शिंदे यांच्यासह शिंदे यांना सहकार्य केल्याप्रकरणी हणमंत ताटफळे, खैरुनिसाबेगम अब्दुल रज्जाक, अप्पाराव नळगे, शंकर ताटफळे, ननुसाब मुजावर, शेख मियाँसाब नासर शेख (सर्व रा़जांब बु़) यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुखेड न्यायालयाचे न्यायाधीश एजाज महमंद यांनी मुखेड पोलिसांना दिले असून मुखेड पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी फिर्यादीच्या बाजुने अॅड़ हणमंत अस्पतवाड, अॅड़सोनटक्के यांनी काम पाहिले़ या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक एस़एस़ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण करीत आहेत़ (वार्ताहर)
एक प्लॉट तिघांना विकला
By admin | Updated: May 22, 2014 00:30 IST