शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुले पळविणारे समजून बेदम मारहाण झालेल्या बहुरुप्याचा उपचारा दरम्यान मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:18 IST

मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. 

औरंगाबाद : मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. 

चोर आणि मुले पकडणारे समजून शेकडो लोकांनी दोन बहुरूप्यांना बेदम मारहाण केली. मारहाण होत असताना दोघेही ‘आम्ही बहुरूपी आहोत’, असे ओरडून सांगत होते. मात्र, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. येईल तो प्रत्येक नागरिक त्यांना एक-दोन फटके देत होता. यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले होते. पोलिसांनी मोहननाथ भैरूनाथ सोडा (३८) आणि विक्रमनाथ लालूनाथ भाटी (३५, दोघे रा. हर्सूल सावंगी, मूळ रा. मध्यप्रदेश) या दोघांची सुटका करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते.

( अफवांचे पेव कधी थांबणार; औरंगाबादेत चोरी आणि अपहरणाच्या संशयावरून दोन युवकांना बेदम मारहाण )

यापैकी मोहननाथ यांची प्रकृती चिंताजनक होती व त्यांच्यावर अतीव दक्षता कक्षात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री मोहननाथ सोडा यांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालयातून मिळाली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे. चोर आल्याच्या अफवेचा औरंगाबाद जिल्ह्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वैजापूर येथील घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीKidnappingअपहरणAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस