शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

एक दिवस निसर्गासोबत...

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

सचिन मोहिते, नांदेड दाटलेल्या आभाळातून बेधुंद होवून सर्वदूर बरसणारा पाऊस़़़ डोंगरदऱ्यातून सुसाट कोसळणारा धबधबा़़़ हिरव्यागर्द रंगाने व्यापलेली झाडी़़़ पशु- पक्ष्यांचा निनाद़़़

सचिन मोहिते, नांदेडदाटलेल्या आभाळातून बेधुंद होवून सर्वदूर बरसणारा पाऊस़़़ डोंगरदऱ्यातून सुसाट कोसळणारा धबधबा़़़ हिरव्यागर्द रंगाने व्यापलेली झाडी़़़ पशु- पक्ष्यांचा निनाद़़़ आणि दऱ्या खोऱ्यातील निसटत्या पायवाटेने जीव मुठीत घेऊन, निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी निघालेली तरूणाई़़़़ हे चित्र नांदेड नेचर क्लब व निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने काढलेल्या नाशिक येथील पावसाळी ट्रेकिंगचे़निसर्गाच्या सान्निध्यातील रोमांचकारी अनुभवांची शिदोरी पाठीशी घेण्यासाठी पुन्हा एकदा नांदेड नेचर क्लब व निसर्ग मित्र मंडळाने साद घातली़ आणि ५० हून अधिक सदस्यांनी प्रतिसाद दिला़ २८ जुलै रोजी नांदेडहून नाशिककडे ट्रॅव्हल्सने प्रवास सुरू झाला़ २९ जुलै रोजी सकाळी नाशिक जवळ असतानाच जोरदार पावसाशी गाठ पडली़ सकाळचा नाष्टा, चहा घेवून डोंगरचढाईला निघालेल्या तरूणाईला केव्हा एकदा निसर्गाच्या कुशीत जावे, असेच झाले होते़ पावसाचा जोर कायम असल्याने नद्या नाल्यांना आलेला पुर आणि वाहतुकीने खोळंबलेले रस्ते़ मात्र या अडथळ्यावर मात करीत तरूणांनी निसर्गाकडे धाव घेतली़ ओल्याचिंब वेशात चिखल तुडवीत, खळाळणाऱ्या पाण्यातून वाट काढीत, पाना- फुलांशी संगत करीत तर पक्ष्यांसोबत हितगुज करीत सदस्यांनी ट्रेकिंगला सुरूवात केली़ डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या दुरच्या पर्वतरांगा धुसर हिरवट रंगांनी व्यापल्या होत्या़ दुधारवाडी धबधब्याचे दृष्य डोळ्यात न सामावणारे होते़ हे चित्र पाहून तरूणांनी एकच जल्लोष केला़ निसर्गाच्या या रूपाने सर्वांचच मने प्रफुल्लीत झाले़ अजुनही पावसाची सोबत आणि तरूणाईचा उत्साह कायम होता़ डोंगरमाथ्यावरून खाली उतरताना निसटत्या वाटेवर प्रत्येक पाऊल जपून पडत होता़ जंगलातून वेगाने वाहणारी फेसाळलेली नदी पुढे येताच सर्वांचे थबकणे आणि नदीकाठावर छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करणे हे क्षण न विसरता येणारेच़ हळू हळू दिवस पश्चिमेला कलताना ढंगांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता़ जंगल तुडवित निघालेल्या सदस्यांना परतीचे वेध लागले़ भिजलेल्या अंगांनी निसर्गाचा निरोप घेताना पाय जड झाले होते़ रस्त्यात छोट्या टपरीवर थांबून गरम भज्यासोबत चहाचा अस्वाद घेवून मक्यावर ताव हाणला़ सायंकाळी पुन्हा नाशिक ते नांदेड हा प्रवास सुरू झाला़ हरवत चालेल्या निसर्गावरील प्रेम वृद्धींगत करण्यासाठी या सहलीचे आयोजन केले होते़ आणि एक दिवस निसर्गासोबत म्हणत कल्बच्या सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतला़ या सहलीसाठी आरती पुरंदरे, प्रमोद देशपांडे, मंजुषा देशपांडे, आतिंद्र कट्टी, प्रसाद शिंदे, महेश होकर्णे, निलेश पेठकर आदींचा सहभाग होता़