शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या एक दिवस अगोदर केंद्र बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्र बदलण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : परीक्षा विभागाच्या गोंधळाची परंपरा कायम

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलपरीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्र बदलण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.विद्यापीठातर्फे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यात विधिसह बी.एड., एम.कॉम. आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐनवेळी गोंधळ उडाला. याविषयीची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील विवेकानंद महाविद्यालयात एलएल.बी. प्रथम ते तिसरे वर्ष (तीन वर्षे कोर्स) या अभ्यासक्रमाचे अद्याक्षर ए ते एम क्रमांकाचे विद्यार्थी परीक्षा देणार होते. मात्र, बदल करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रानुसार या महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात परीक्षा देतील. या विद्यार्थ्यांना हे केंद्र देण्यात आले आहे, तसेच डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात परीक्षा क्रमांक आलेले याच अभ्यासक्रमाचे एन ते झेड अद्याक्षराचे विद्यार्थी व्ही.एन. पाटील विधि महाविद्यालयात परीक्षा देतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील बी.एड. अभ्यासक्रमाचे परीक्षा केंद्र बदलून कै. महारुद्र (बप्पा)मोटे अध्यापक महाविद्यालय गिरवली आणि राजीव गांधी अध्यापक महाविद्यालय, चिंचोली फाटा याठिकाणी देण्यात आले आहे. बीड शहरातील तुलसी संगणशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याठिकाणी देण्यात आले आहे.कोट,काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत. काही ठिकाणी संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थी संख्या कमी करण्याची मागणी केली होती. या सगळ्याचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे.-डॉ. प्रताप कलावंत, उपकुलसचिव, परीक्षा विभाग

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठexamपरीक्षा