शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

कोरोनाचा फटका; औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात दीड लाख कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:49 IST

वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि पैठण- चितेगाव या पाचही औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना फटका

ठळक मुद्दे ‘सिटू’ या कामगार संघटनेने केला दावा एक लाख कंत्राटी कामगारांनी गमावली नोकरी 

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील पाचही औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत सुमारे दीड लाख कामगार- कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. यामध्ये अस्थायी ५० हजार व कंत्राटी पद्धतीच्या १ लाख कामगार- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा ‘सिटू’ कामगार संघटनेचे नेते उद्धव भवलकर यांनी केला आहे. 

‘लोकमत’शी बोलताना उद्धव भवलकर म्हणाले की, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि पैठण- चितेगाव या पाचही औद्योगिक वसाहतींमध्ये ‘सिटू’चे मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. संघटनेच्या पाहणीतून हे आकडे समोर आले. लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद असले तरी त्यांना वेतन मिळाले पाहिजे, अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतली होती. मात्र, अस्थायी कामगारांना उद्योगांनी एक छदामही दिला नाही. उपासमारीमुळे अनेक कामगार गावी परतले. ‘अनलॉक’ सुरू झाल्यानंतर हळूहळू उद्योग सुरू झाले. सद्य:स्थितीत पूर्णक्षमतेने बाजारपेठा सुरू नाहीत. त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नाही. दुसरीकडे आॅर्डरही घटल्या आहेत. त्यामुळे ३० ते ६० टक्के उत्पादन क्षमतेने उद्योग सुरू आहेत. 

जिल्ह्यात एकूण सव्वादोन लाख कंत्राटी, तर दीड लाख स्थायी- अस्थायी कामगार उद्योगांत कार्यरत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील दीड लाख कामगारांना नोकरी गमवावी लागली. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष प्रभाकर मते यांनी सांगितले की, कोरोनाने लाखो कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. औरंगाबादचे लाखो कामगार बेरोजगार झाले. उद्योगांनी या कामगारांना परत कामावर घ्यावे, यासाठी आम्ही उद्योगमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 

...अन्यथा बेरोजगार कामगार गुन्हेगारीकडे वळतीलकामगार नेते उद्धव भवलकर म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात दीड लाख कामगार-कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. या कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील किमान अर्धे तरी वेतन मिळाले पाहिजे. त्यांना परत कामावर घेतले पाहिजे; अन्यथा उपासमारीमुळे त्रस्त झालेले हे बेरोजगार कामगार गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका आहे. 

सुमारे ६० हजार कामगार-कर्मचाऱ्यांवर संकट ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी मात्र, नोकरी गमावलेल्या कामगार- कर्मचाऱ्यांची संख्या ६० हजारांच्या जवळपास असेल, असे सांगितले. ते म्हणाले की, उद्योग सुरू झाले. मात्र, जिल्हा- राज्य सीमा बंद असल्यामुळे अनेक कामगार अडकून पडले आहेत. पास काढून यावे, तर आल्यावर दहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागते म्हणून ते येत नाहीत. ५३ वर्षांवरील कामगार सुरक्षेसाठी घरी बसून आहेत. दुसरीकडे, अजूनही बाजारपेठा पूर्ण क्षमतेने उघडलेल्या नसल्यामुळे उद्योग ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे सध्या कामगारांची तेवढी गरज भासत नाही.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायLabourकामगार