शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांच्या घरात दीड किलो सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:06 IST

लिपिकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगरपालिकेचा महसूल उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाण याच्या घरात दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५० रुपयांची रोकड अन् विविध बँक खात्यांचे पासबुक आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिपिकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगरपालिकेचा महसूल उपायुक्त अय्युब खान नूरखान पठाण याच्या घरात दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५० रुपयांची रोकड अन् विविध बँक खात्यांचे पासबुक आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली.याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक किशोर चौधरी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोजंदारीवरील कनिष्ठ लिपिकास सेवेत कायम करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मनपातील आस्थापना विभागाचा उपायुक्त (महसूल) अय्युब खान याने तीन लाख रुपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून वरिष्ठ लिपिक दादाराव लाहोटी याच्यामार्फत २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी स्वीकारले. याप्रकरणी आरोपीविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईनंतर पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याचा टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील बंगल्याची झडती घेतली. रात्रभर चाललेल्या या झडतीत घरात दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, ४ लाख १९ हजार ६५० रुपयांची रोकड हाती लागली. यासोबतच दोन बँकखात्यांचे पासबुक आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली. याशिवाय त्याचे बँक लॉकर असावे, असे पोलिसांना वाटते; परंतु त्याबाबतची माहिती मिळाली नाही.चार पथकांनी केली कारवाईलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्त खान आणि वरिष्ठ लिपिक लाहोटी यांच्यावरील कारवाईसाठी चार पथके पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी नेमली. या पथकापैकी एक पथक मनपात, दोन पथके अय्युब खानच्या कार्यालयाबाहेर तर चौथे पथक अय्युब खानच्या बंगल्याबाहेर उभे होते. सापळा यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी अय्युब खानच्या बंगल्यावर धडक मारली. अय्युब खान यास पकडल्यानंतर साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी त्याच्या बंगल्यावर धडक मारली. यावेळी अय्युब खानच्या नातेवाईकांनी पोलिसांना बंगल्यात प्रवेश नाकारला. त्यावेळी पोलिसांनी अय्युब खानला लाच घेताना पकडल्याचे सांगून घरझडतीच्या कारवाईसाठी एसीबीला सहकार्य करण्याचे सांगितले. तेव्हा त्यांना हे खरे पोलीस आहेत यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.यामुळे शेवटी पोलिसांनी एसीबीच्या अन्य अधिका-यांच्या फोनवर संपर्क साधून अय्युब खानला बोलण्यास सांगितले. तेव्हा अय्युब खानने त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याचे कळविल्याचे सूत्रांकडून समजले. खान याच्या बंगल्याच्या झडतीत पोलिसांच्या हाती लागलेल्या सोन्या-चांदीचे अलंकाराचे वजन करून त्याचे मूल्य निश्चित करण्यासाठी एसीबीने शहरातील एका ज्वेलर्सला पाचारण केले.