शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा अण्णा नाईकांच्या एंट्रीने भरणार धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:02 IST

अण्णा नाईक परत येतायेत. स्मॉल स्क्रीनवर ज्या अण्णा नाईकांचा दरारा होता ते अण्णा नाईक आता परत येतायत. नाईकांच्या वाड्यातलं ...

अण्णा नाईक परत येतायेत. स्मॉल स्क्रीनवर ज्या अण्णा नाईकांचा दरारा होता ते अण्णा नाईक आता परत येतायत. नाईकांच्या वाड्यातलं गूढ हे प्रत्येक वेळी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आणि आता अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर प्रेक्षकांसमोर नवा ट्विस्ट असणारेय. कारण रात्रीस खेळ चाले पार्ट २ मध्ये अण्णा नाईकांचा मृत्यू दाखवला होता. त्यामुळे 'सीझन ३' मध्ये अण्णा नाईकच परत येतायत म्हटल्यावर रहस्याची शृंखला नव्या सिझनमध्येदेखील पाहायला मिळणारेय.

सईचा रेड ड्रेसमध्ये जलवा

अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत सई ताम्हणकर तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला ती अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील तीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंग असतात. नुकतेच सईने इंस्टाग्रामवर व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने रेड ड्रेसमधीस फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. सई लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

राज कुंद्राच्या उत्तराने शिल्पा झाली हैराण

शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज कुंद्रा आपल्या बेडरूमधील सीक्रेट सांगताना दिसतो आहे. व्हिडिओमध्ये राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला विचारेल की तुझा आवडता जॉनर कोणता आहे? यावर शिल्पा शेट्टी काही बोलत नाहीत. राज कुंद्रा स्वत: हसतो आणि म्हणतो, फिफ्टी शेड्स ऑप ग्रे' शिल्पा ऐकतच लाजते आणि जोरात हसू लागते. इतकेच नाही तर राजसुद्धा स्वत: खूप हसतो आणि म्हणतो, सॉरी हे आमचे बेडरूमचे सीक्रेट आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.