शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

एकीकडे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश होईना, त्यात नव्या १६ काॅलेजची भर

By योगेश पायघन | Updated: September 3, 2022 12:26 IST

नवीन १६ महाविद्यालयांना शासनाची अंतिम मान्यता

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवेल यांनी गुणवत्ता वाढ आणि भौतिक सुविधा तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १९ महाविद्यालयांविरुद्ध दंडात्मक आणि प्रवेशबंदीची कारवाई केली, तर २१ महाविद्यालयांतील मूळ मान्यतेव्यतिरिक्तचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद केले. अशी अवस्था असताना विद्यापीठ कार्यक्षेत्रात २०२२-२३ मध्ये १६ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य शासनाने अंतिम मान्यता दिली आहे. यात १४ काॅलेज कला, वाणिज्य, विज्ञान व २ काॅलेज विधि अभ्यासक्रमाचे आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) २०२२ मध्ये विद्यापीठ यावर्षी ८३ व्या स्थानी झळकले. गेल्यावर्षीच्या तुलनेत रँकिंग घटली. विद्यापीठाने रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. प्रवेश न होणारे अभ्यासक्रम बंद केले, तर पेटंट, संशोधनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. केवळ परीक्षेसाठी प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांसह भाैतिक सुविधा, प्राचार्य, अध्यापक नसलेल्या महाविद्यालयांची तपासणी सुरू केली. त्यात आतापर्यंत ४० महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली. अजून ५० हून अधिक महाविद्यालयांची तपासणी होण्याची शक्यता आहे. पारंपरिक कोर्सेसला निम्मेही प्रवेश होत नसताना नव्याने १६ महाविद्यालयांना मान्यता शासनाने दिल्याने कायम विनाअनुदानित तत्त्वावर अंतिम मान्यता दिली आहे.

या अटींवर मिळाली मान्यतानवीन महाविद्यालयांनी सहसंचालकांकडे भविष्यात कोणत्याही अनुदानाची मागणी करणार नसल्याचे हमीपत्र द्यावे. तोपर्यंत संलग्नीकरणाची प्रक्रिया करू नये. भाैतिक सुविधा अटींची पडताळणी सहसंचालकांनी करावी. त्यानंतरच विद्यापीठ संलग्नतेसाठी पत्र द्यावे. निकषांची पूर्तता केल्यावरच विद्यापीठाकडून संलग्नीकरण देऊ नये. ५० टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशित झाल्यास मान्यता रद्द समजण्यात येईल, अशा अटी शासन आदेशात आहेत.

नवे पारंपरिक महाविद्यालये नकोपायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांवर विद्यापीठाद्वारे सुरू असलेल्या कारवाईत हस्तक्षेप केला जाणार नाही, असे उच्च न्यायालयाने आदेशित केले. शासनाने नवीन पारंपरिक महाविद्यालये देणे बंद करावे. एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलतो.-डॉ. विक्रम खिलारे, बामुक्टो संघटना.

या महाविद्यालयांना मिळाली मान्यता: - छत्रपती शाहू महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड-केशवराव दादा पडुळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाडसावंगी-राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय, लिंबे-मा. बाळासाहेब ठाकरे वरिष्ठ महाविद्यालय, माळी घोगरगाव-कल्पतरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालय, निमगाव-श्री छत्रपती वरिष्ठ महाविद्यालय, गारज-सह्याद्री कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावरगाव-चित्राई महाविद्यालय, आडगाव-राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाचनवेल-श्री गणपती महाविद्यालय, देवमूर्ती जालना-छत्रपती संभाजी महाराज महाविद्यालय, रामनगर-राजमाता जिजाऊ महाविद्यालय, बदनापूर-स्व. आ. भाऊसाहेब आजबे वरिष्ठ महाविद्यालय, डोंगर किन्ही, बीड- ॲड. बी. डी. हंबर्डे विधी महाविद्यालय, आष्टी, बीड-डाॅ. सुभाषराव ढाकणे विधि महाविद्यालय, रोहणवाडी, जालना

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद