शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 15:47 IST

Omicron Variant: रुग्णालयात उपचारासाठी भरती कराव्या लागणाऱ्या संभाव्य ११ हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांत दाखल होतील.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या (Corona in Aurangabad ) ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण सक्रिय होते, त्याच्या दीडपट रुग्ण तिसऱ्या लाटेत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३१ हजार ९२३ रुग्ण सक्रिय राहण्याचा अंदाज आरोग्य विभागाने काढला आहे. मात्र, यातील ६५ टक्के म्हणजे २० हजार ७५० रुग्ण हे होम आयसोलेशनमध्येच बरे होणार आहेत. तर ३५ टक्के म्हणजे ११ हजार १७३ रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागेल.

राज्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा एकच कहर पाहायला मिळाला. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आणि मृत्यूचेही प्रमाण वाढले. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनपासून इतर उपचार सुविधांच्या बाबतीत कसोटीच लागली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आतापासूनच खबरदारीची पावले टाकत आहे. रुग्णालयात उपचारासाठी भरती कराव्या लागणाऱ्या संभाव्य ११ हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांत दाखल होतील. ५ हजार ५८७ रुग्णांपैकी केवळ २२३ जणांनाच व्हेंटिलेटरची गरज भासेल, असा अंदाज आहे. दुसऱ्या लाटेत एकाच वेळी रुग्णालयांत १५ हजार रुग्ण दाखल होते.

६० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरजही पडणार नाहीतिसरी लाट आली तर शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या ६० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरजही पडणार नाही. केवळ ३२ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडू शकते. ४ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर राहतील. त्यानुसार रोज ४६ मे. टन ऑक्सिजनचा साठा असणे अपेक्षित आहे. घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका आणि जि. प.चे आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहेत. त्यादृष्टीने ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्यासह उपचार सुविधाही सज्ज केली जात आहे.

शक्यता गृहीत धरून तयारीरुग्ण कधी वाढणार, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. परंतु तशी शक्यता गृहीत धरून उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.- बाळासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस