शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या पैशावरून वृद्धाचा केला खून; आरोपीस पाच दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:12 IST

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एका तरुणाने वृद्धाचा खून केल्याची घटना पायलटबाबानगरी चौकात बुधवार रोजी घडली

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एका तरुणाने वृद्धाचा खून केल्याची घटना पायलटबाबानगरी चौकात बुधवार रोजी घडली. फिलीप वामन वाघमारे (६५, रा. संतोषीमातानगर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सम्राट हॉटेलसमोर त्यांना हल्ला करून ठार केले होते.

वैद्यकीय आहवालातही त्याच्या अंगावर जखमा, डोक्याच्या पाठीमागून जखम असल्याने मृत्यू झाला, असा अभिप्राय शवविच्छेदनात डॉक्टरांनी आहवालात दिला होता. शांताबाई वाघमारे यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी फौजदार संजय बनसोड, सहायक फौजदार शेख हारुण, क ौतिक गोरे, पोहेकॉ. शेख असलम, कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांच्या पथक पाठविले. 

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून अमोल शिवाजी चौरे (२९, रा. जयभवानीनगर) यास शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु विश्वासात घेतल्यानंतर त्याने वाघमारे या वृद्धाच्या खुनाची कबुली दिली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोघांत हाणामारी झाली. त्यातच तो जखमी होऊन मयत झाल्याचे अमोलने पोलिसांना सांगितले. आरोपी अमोल चौरे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची कोठडी देण्यात आली. अधिक तपास फौजदार संजय बनसोड करीत आहेत. 

शवविच्छेदनाच्या अहवालातून खुनाचे गूढ उलगडलेफिलीप वामन वाघमारे मृत्यूप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनप्रसंगी मृतदेह पाण्याने धुतला असता अंगावरील जखमा आणि डोक्याच्या मागे असलेली मोठी जखम त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे जाणवले. मारहाण व डोक्याच्या मागील भागास झालेली जखम हे त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे मारहाणीमुळे मृत्यू कसा होऊ शकतो म्हणून वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी स्थळ पंचनामा केला; परंतु घटनास्थळी तसे काही आढळून आले नाही.  खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हेगारापर्यंत पोलिस पोहोचले.

दारू पिऊन देत होता शिव्यादारूच्या नशेत वृद्ध शिव्या देत होता. हॉटेल व्यावसायिक अमोल शिवाजी चौरे याच्यासोबत त्याचा वाद झाला व त्यातूनच त्या वृद्धाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. त्याने वृद्धाला कसे मारले त्याविषयीची सखोल माहिती आरोपीकडून मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.