शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या शहरातील रुंदीकरण कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:01 IST

जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती. निवडक रस्ते रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. महापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुन्या शहरातील अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी महापालिकेने घोषणा केली होती. निवडक रस्ते रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. महापालिकेतील नगररचना विभागाने एका महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानंतर धार्मिक स्थळांना मोबदला देण्यासाठी खास शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.दिवाण देवडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा ते मोतीकारंजा या भागातील रस्ते रुंद करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. १५ दिवसांत रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करावे, रुंदीकरणातील धार्मिक स्थळांना मोबदला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नगररचना विभागाने काहीच कारवाई न केल्याने जुन्या शहरातील रस्त्यांचा प्रश्न जशास तसा आहे.२०११-१२ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जुन्या शहरातील ११ पेक्षा अधिक रस्ते रुंद केले होते. महापालिकेच्या तिजोरीत फक्त चार कोटी रुपये असतानाही त्यांनी व्यापक रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. ज्या मालमत्ताधारकांनी जागेवर मोबदला मागितला तरी त्याला देण्याची तयारी मनपाने दर्शविली होती.महापालिकेने नंतर सर्व मालमत्ताधारकांना टीडीआर, एफएसआय दिला होता. मागील ७ वर्षांमध्ये जुन्या शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळही प्रचंड वाढली आहे. त्यातच अरुंद रस्त्यावर अतिक्रमणेही तेवढीच वाढली आहे.जुन्या शहरातील काही रस्त्यांचा श्वास मोकळा केला असला तरी अद्याप काही रस्त्यांवर धार्मिक स्थळे जशास तशी उभी आहेत, तर काही रस्त्यांचे रुंदीकरणच झालेले नाही. दिवाण देवडी, सिटीचौक ते गुलमंडी, औरंगपुरा ते मोतीकारंजा या रस्त्यावर चार धार्मिक स्थळांचा अडथळा असल्याने मोबदला देण्याचा विषय प्रलंबित आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या