शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम! कर्ज वाटपासाठी बँका फुटपाथवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:15 IST

तात्काळ अर्ज आणि ऑनलाईन कागदपत्रांच्या आधारे झटपट ‘पर्सनल लोन’

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : ‘पितळी ठेवून कोणी खडकू देईना राव’, असा जुन्या जमान्यात वाक्प्रचार होता. दुष्काळात कर्ज देण्यासाठी फुटपाथवर आलेल्या बँकांचा नवीन फंडा पाहून ‘नागरिकांनीही तोंडा’त बोट घालण्याची वेळ आली आहे; परंतु ऑनलाईन सुविधांमुळे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी तात्काळ करून अर्ज आणि झटपट कर्ज असेच चित्र शहरातील रस्तोरस्ती सध्या दिसते आहे. बँकांच्या या रस्त्यावरील कर्ज मेळाव्यात विचारपूस करण्यासाठी तोबा गर्दी उसळते आहे.

कर्ज घेण्यासाठी बँकात फेऱ्या मारून नागरिकांच्या चपला झिजवाव्या लागतात. सध्याही शासकीय योजनांतून कर्ज प्रकरण मंजुरीसाठी बँकांसमोर मंडप पडलेले आहेत. बँकाही कागदपत्रात त्रुटी काढून कर्ज प्रकरणे नामंजूर करतात किंवा स्वयंरोजगाराचा बँकेतील व्यवहार पाहून त्याचे कर्ज प्रकरण मंजूर केले जाते. हे सर्व पाहून अनेकदा नको ते कर्ज म्हणणारे कमी नाहीत; परंतु ‘तीन मिनिटांत कर्ज तुमच्या खात्यात’, असा सिडको एन-६ स्मशानभूमीसमोरील फलक पाहून उत्सुकतेने नागरिक तेथे गर्दी करीत आहेत. इच्छुक नागरिकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक तपासून बँकेच्या नियम व अटीत बसत असेल तर खरेच, तीन मिनिटांत तुमच्या बँक खात्यात पर्सनल लोनची रक्कम जमा होते आहे. 

महिन्याला १ टक्का व्याजदराने म्हणजेच दरसाल दर शेकडा १२ टक्के दराने हे कर्ज परतफेड करावे लागणार आहे. आता कर्जासाठी तारण नाही, बँकेतील तुमच्या आर्थिक व्यवहारानुसार कर्ज मंजूर करण्यासाठी येथे उपस्थित बँक कर्मचारी उत्सुक आहेत. 

दुष्काळसदृश परिस्थितीत झटपट कर्जबँक खात्यात कर्जाची रक्कम ऑनलाईन झटपट वर्ग केली जात असल्याने ‘ये क्या हो रहा है,’ असे म्हणत प्रत्येक जण येथे थांबून कर्ज प्रकरणासाठी विचारपूस करताना दिसत होता. काही जण तुमचे कार्यालय कुठे आहे, तुम्ही असे रस्त्यावर बाजारात थांबल्यासारखे का थांबलात, अशा प्रश्नांचा भडिमारही करीत होते. अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्हीही स्वत: कर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता; परंतु आॅनलाईन पैसे पळवापळवी होत असल्याने नागरिकांची द्विधावस्था दिसत होती. 

 

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद