चंदनझिरा : व्हॉटस्अॅपवर आक्षेपार्य मचकुर अपलोड करणाऱ्या विरूद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदनझिरा येथील अशोक जगन्नाथ थोरात याने सोमवारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईल मधुन व्हॉटस्अॅपवर आक्षेपार्य मजकुर टाकला. याबाबत बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील साजेदलाल खान पठाण यांनी आक्षेप नोंदवून थोरात विरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जमादार नजीर शेख हे करीत आहे. (वार्ताहर)
व्हॉटस्अॅपवर आक्षेपार्य मजकुर टाकणाऱ्या विरूद्ध गुन्हा
By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST