शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी आले सामान्य बोगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:14 IST

‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणताच खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृतीला दूर करून अखेर सामान्य बोगीतून प्रवास करणे सुरू केले आहे

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दौ-याच्या नावाखाली दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांचा ‘व्हीआयपी’ थाट सुरूच होता. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणताच खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृतीला दूर करून अखेर सामान्य बोगीतून प्रवास करणे सुरू केले आहे. वरिष्ठ अधिका-यांना सामान्य बोगीत पाहून रेल्वे प्रवासीदेखील थक्क होऊन जात आहेत.दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी शनिवारी काचीगुडा ते जेडचेर्लापर्यंत काचीगुडा-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी स्लीपर क्लास बोगीतून प्रवास करून प्रवाशांबरोबर संवाद साधून रेल्वेच्या सुविधांविषयी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी कर्नुल सिटी-काचीगुडा तुंगभद्रा एक्स्प्रेसमधून परतीचा प्रवास केला. या रेल्वेतही त्यांनी सामान्य बोगीतून प्रवास करून प्रवाशांबरोबर संवाद साधला.रेल्वे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते. परंतु अधिकाºयांनी ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री-टियर बोगीतून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळावे, अशी सूचना रेल्वेमंत्र्यांनी आॅक्टोबरच्या प्रारंभी केली.परंतु रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतरही रेल्वे अधिकाºयांचा ‘व्हीआयपी’ थाट काही केल्या जात नव्हता. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिका-यांच्या दौ-यात व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन प्रवाशांना घडतच होते.विशेष म्हणजे अधिका-यांनी प्रवाशांमध्ये मिसळावे, असे आदेश असताना सोयी-सुविधांनी सज्ज अशा निरीक्षण बोगीतून प्रवास केला गेला. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणला.विनोदकुमार यादव यांनी पहिल्याच वार्षिक निरीक्षणाचे निमित्त साधून २८ जानेवारीला विशेष बोगीने औरंगाबादला आल्यानंतर शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाऊन देवदर्शन केले होते. हा प्रकारही ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.अखेर ‘दमरे’च्या महाव्यवस्थापकांनी सामान्य बोगीतून प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर अधिका-यांनाही सामान्य बोगीतून प्रवास करावा लागणार आहे.