शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अधिकाऱ्याने स्मॉल फायनान्स बँकेला ३४ लाख ६० हजारांना गंडवले

By राम शिनगारे | Updated: April 7, 2024 20:59 IST

जवाहरनगर पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यासह चौघींच्या विरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत नोकरीला असलेल्या ग्राहक जनसंपर्क अधिकाऱ्याने ७२ ग्राहकांची फसवणूक करीत ३४ लाख ६० हजार ३४४ रुपयांना बँकेलाच गंडविले. या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी अधिकाऱ्यासह चौघींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

आरोपींमध्ये ग्राहक जनसंपर्क अधिकारी (सीआरओ) स्वप्नरेखा भानुदास चौधरी- आघाव (रा. एन-२, रामनगर), बचत गटाच्या स्वयंघोषित अध्यक्षा सुरेखा ढोरे, कविता राठोड आणि पुष्पा साळवे यांचा समावेश आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक राजेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बँकेच्या गारखेडा परिसरातील शाखेला भेट देत दोन ग्राहकांनी आम्ही कर्ज घेतले नसताना आमच्या सिबील अहवालामध्ये ४५ हजार रुपयांचे कर्ज दिसत असल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीची चौकशी केली असता, दोन्ही ग्राहकांनी २०२३ मध्ये कर्जासाठी संपर्क साधला होता.

कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी अर्ज आणि केवायसी सादर केली. त्यानंतर सीआरओ स्वप्नरेखा चौधरी-आघाव हिने कर्ज नाकारल्याचे सांगितले. मात्र, संबंधितांचे कर्ज मंजूर झालेले होते. याविषयी सीआरओ चौधरी-आघावकडे सखोल चौकशी केल्यानंतर तिने पैशाची अफरातफर केल्याचे कबूल केले. त्यानंतर बँकेने अधिक चौकशी केल्यानंतर ७२ खात्यावरून ग्राहकांना चौधरी-आघाव हिने फसवल्याचे आणि गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले. ७२ पैकी ३५ ग्राहकांनी चौधरी-आघावच्या विरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. चौघींच्या विरोधात गुन्हा नोंदवून अधिक तपास सहायक निरीक्षक दिलीप चंदन करीत आहेत.

अशी करायच्या फसवणूकस्वप्नरेखा चौधरी-आघाव ही ग्राहकांशी कर्जाच्या गरजेबाबत संपर्क साधून इच्छुक ग्राहकांची कर्ज प्रक्रिया सुरु करणे, अर्ज-अर्ज फॉर्म आणि केवायसी घेऊन ग्राहकांची दिशाभूल करीत होती. त्यानंतर मूळ ग्राहक समाेर उभे न करताच बचत गटाच्या स्वयंघोषित अध्यक्षा सुरेखा ढोरे, कविता राठोड आणि पुष्पा साळवे यांना ग्राहक भासवत होती. मूळ ग्राहकांच्या नावावर कर्ज घेऊन त्या निधीचा स्वत:साठी उपयोग करीत असल्याचे चौकशीत उघडकीस आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकAurangabadऔरंगाबाद