आखाडा बाळापूर : येथील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या जुन्या विश्रामगृहात स्थलांतरीत झालेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे सर्वच कर्मचारी वरिष्ठांचे कोणतेच नियंत्रण नसल्याने नेहमीप्रमाणे तीन सेवकावर कार्यालय सोडून पसार आले. गुरूवारी दुपारी एक वाजता सदर प्रतिनिधीने कार्यालयास भेट दिली असता हे चित्र समोर आले. हिंगोली- नांदेड रस्त्यावरील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग-४ कार्यालय आहे. पुर्वीपासून असलेले कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय काही महिन्यांपुर्वी जुन्या विश्रामगृहात स्थलांतरीत झाले. अगोदरच निसर्गरम्य वातावरणात असलेल्या विश्रामगृहाला कार्यालय बनविण्यासाठी व पारदर्शक कारभार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रासह लाखो रुपये खर्च करण्यात आले. संपूर्ण कामकाज संगणकावर चालत असल्याने सर्व खोल्या वातानुकूलीत बनविल्या; परंतु लाखो रुपये खुर्चूनही या ठिकाणी कर्मचारी थांबण्यास तयार नाहीत. २८ कर्मचार्यांचा ताफा कामकाजासाठी आहे. मात्र गुरूवारी ९ मे रोजी दुपारी एक वाजता प्रत्यक्ष कार्यालयास भेट दिली असता दोन सेवक व एक मुकादम आराम करीत असल्याचे दिसले. कार्यकारी अभियंता कार्यालय कुलूपबंद होते. संगणक कक्ष, लेखा शाखा, रेखाचित्र, अभिलेखा, भांडार, तांत्रिक शाखेमध्ये फक्त फॅन सुरू होते. आस्थापना, भूसंपादन विभागही कर्मचार्याविनाच होते. आवक-जावकलाही कर्मचारी नव्हता. येथील सेवकास कर्मचार्यांविषयी विचारले असता आपणास माहिती नसल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता एस.एम. शेख यांना एकही कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे मोबाईलवरून संपर्क साधून विचारले असता १० कर्मचारी माझ्या सोबत साईटवर आहेत तर उर्वरित प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगितले. (वार्ताहर)
सेवकावर कार्यालय; अधिकारी वार्यांवर
By admin | Updated: May 9, 2014 00:23 IST