शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद खंडपीठ स्थापनेचा उद्देश सफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:28 IST

केवळ दोन न्यायमूर्ती, निवडक वकील आणि काही हजार प्रकरणांसह सुरू झालेल्या या खंडपीठात आज सोळा न्यायमूर्ती, साडेतीन हजार वकील आणि वर्षाला सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे दाखल होत असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश एच. पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रभारी मुख्य न्यायमूर्ती पाटील : वर्धापन दिन कार्यक्रमात प्रतिपादन; न्यायमूर्ती, ज्येष्ठ वकील, सनदी अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केवळ दोन न्यायमूर्ती, निवडक वकील आणि काही हजार प्रकरणांसह सुरू झालेल्या या खंडपीठात आज सोळा न्यायमूर्ती, साडेतीन हजार वकील आणि वर्षाला सुमारे ३५ हजारांपेक्षा जास्त प्रकरणे दाखल होत असल्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश एच. पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत व्यक्त केले.जनहित याचिकांची वाढलेली प्रचंड संख्या पाहता, समाजातील अनेक प्रश्नांची सोडवणूक न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकेल हा सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ करताना घटनेने आपल्याला दिलेले अधिकार आणि जबाबदाºयांचे सर्वांनी कसोशीने पालन करावे, असे आवाहन न्या. पाटील यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य न्या. पाटील बोलत होते. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तीद्वय बी. एन. देशमुख आणि न्या. पी. व्ही. हरदास उपस्थित होते. व्यासपीठावर खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल कराड, उपाध्यक्षद्वय अ‍ॅड. राम शिंदे व अ‍ॅड. मंजूषा जगताप आणि सचिव कमलाकर सूर्यवंशी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.एखाद्या संस्थेच्या आयुष्याची ३७ वर्षे म्हणजे फार मोठा कालावधी नाही; परंतु औरंगाबाद खंडपीठामध्ये या कालावधीत अनेक मान्यवरांनी वाखाणण्याजोगे कार्य करून अनेक नवीन पायंडे पाडले. नवनवीन, उज्ज्वल परंपरा निर्माण केल्या. त्या उज्ज्वल परंपरेचे पाईक होण्याकरिता खंडपीठातील तरुण वकिलांनी त्यांचे पालन आणि अनुकरण करायला हवे. त्यातूनच आणखी नवीन, उज्ज्वल परंपरा निर्माण होतील, असे न्या. पाटील म्हणाले.‘चांगले चारित्र्य आणि उच्च मूल्ये हेच यशाचे गमक आहे, तरुण वकिलांनी ज्ञानाच्या बरोबरीने मूल्यांची आणि प्रामाणिकपणाची जपणूक करीत काम करण्याचे आवाहन न्या. बी. एन. देशमुख यांनी केले.खंडपीठाची होत असलेली प्रगती नेत्रदीपक असल्याचे न्या. पी. व्ही. हरदास यांनी म्हटले. न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये असलेल्या सौहार्दतेमुळे किती चांगली कामे होऊ शकतात हे आपण प्रत्यक्ष अनुभवल्याचे त्यांनी म्हटले. खूप मोठी परंपरा आणि नावलौकिक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. नरेश पाटील यांची झालेली निवड आपल्यासर्वांकरिता अभिमानास्पद आणि प्रेरणा देणारी आहे, असे न्या. हरदास म्हणाले.तेराव्या खेळाडूची धुवाधार बॅटिंगअचानकपणे बॅटिंगला पाठविलेला पॅव्हेलियनमधील तेरावा खेळाडू म्हणून मैदानात (मंचावर) आलेले न्या. प्रसन्ना वराळे यांनी मराठीमधून केलेल्या खुमासदार वक्तव्याने चांगलीच रंगत निर्माण केली. मुख्य न्या. पाटील यांच्यापुढे आणि त्यांच्यासोबत काम करतानाचे अनेक अनुभव त्यांनी कथन केले. खंडपीठाचा वर्धापन दिन म्हणजे आपल्या सर्वांसाठीच सिंहावलोकनाचा आणि सर्वांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याचा दिवस आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याकरिता आपण काय करू शकतो, संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने आपली वाटचाल कशी असावी यावर विचारमंथन करण्याचा हा दिवस आहे, असे ते म्हणाले.वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल कराड यांनी प्रास्ताविकात खंडपीठाच्या नवीन इमारतीचे आणि वकिलांच्या कक्षाचे काम व इतर मागण्या मांडल्या आणि स्वागत केले. अ‍ॅड. रश्मी गौर-सबनीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर वकील संघाचे सचिव कमलाकर सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला औरंगाबाद खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, ज्येष्ठवकील, सनदी अधिकारी आणि वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.न्या. पाटील भावी पिढीचे आदर्श४औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय केलेले मराठवाड्याचे सुपुत्र त्याच ठिकाणी न्यायमूर्ती आणि नंतर जगभर नावलौकिक असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती बनलेले न्या. नरेश पाटील हे भावी पिढीचे आदर्श असल्याच्या भावना वक्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.राज्यपाल आणि मुख्य न्या. ताहिलरमाणी यांचे संदेश४राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आणि सध्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती असलेल्या न्या. विजया कापसे-ताहिलरमाणी यांचे खंडपीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या संदेशांचे अ‍ॅड. राम शिंदे आणि अ‍ॅड. संगीता धुमाळ-तांबट यांनी वाचन केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ