शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ओबीसी-भटक्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:23 IST

नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे भटक्या - विमुक्तांच्या संघटनांनी धरणे आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविध आर्थिक विकास महामंडळांच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, त्यासाठी या महामंडळांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, या व इतर प्रमुख मागण्यांसाठी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे भटक्या - विमुक्तांच्या संघटनांनी धरणे आंदोलन केले. नंतर सामाजिक न्याय खात्याचे उपायुक्त पी. बी. बच्छाव व त्या- त्या महामंडळांच्या व्यवस्थापकांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.भटके- विमुक्त आदिवासी विकास परिषद, महात्मा फुले समता परिषद, महाराष्टÑ राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, ओबीसी विकास सेवा मंडळ, भारिप- बहुजन महासंघ, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती, जनक्रांती संघ, सावता परिषद, वडार फोरम, फुले ब्रिगेड, अ. भा. कैकाडी महासंघ, विश्वकर्मा सुतार समाज, नाभिक महामंडळ, अशा विविध संस्था- संघटनांचे कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.मनोज घोडके, अमिनभाई जामगावकर, संजय मेडे, अंबादास रगडे, सरस्वती हरकळ, संजीवनी घोडके, रामभाऊ पेरकर, मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, अ‍ॅड. महादेव आंधळे, एम. डी. तय्यब, एल. एम. पवार, अनिता देवतकर, दत्ता बिडवे, रतनकुमार पंडागळे, बाबासाहेब जाधव, दीपक राऊत, अविनाश वारकरी, पंडितराव तुपे, रमेश गायकवाड, संदीप घोडके, विलास ढंगारे, संदीप घुगरे, आर. जी. देठे, टी. एस. चव्हाण, जुबेर शहा, परमेश्वर इंगोले, सुनील गायकवाड, बाबासाहेब म्हस्के, तुकाराम महाराज शिंदे, रोहिदास जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी व भटके-विमुक्त बांधव उपस्थित होते.यावेळी करण्यात आलेल्या मागण्या अशा : तेराशेहून अधिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करून ती महागाई निर्देशांकानुसार देण्यात यावी, ओबीसीसाठीच असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी ओबीसीचीच नियुक्ती करण्यात यावी, जात पडताळणीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, ओबीसी- भटक्यांची जनगणना सक्तीने करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ देण्यात यावेत, आठ लाखांच्या क्रिमिलेअरच्या अटीचा अद्यापही जीआर काढण्यात आला नाही, तो लवकर काढण्यात यावा.