औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात १० खाटांचे पोषण पुनर्वसन केंद्र गेल्या वर्षी सुरु करण्यात आले होते. यंदा जिल्हा रुग्णालय कोविड हाॅस्पिटल झाल्याने ते केंद्र बंद आहे. हे केंद्र पुन्हा सुरु होण्याची गरज आहे. त्यामुळे तात्पुरते करमाड येथील रुग्णालयात हे केंद्र हलवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रसाद मिरकले यांनी सांगितले.
या केंद्रात १४ दिवस मातांसोबत बालकांना ठेवून आहार तज्ज्ञांच्या देखरेखित उपचार केले जात होते. जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी शंभराहून अधिक बालकांना त्यांचा लाभ झाला. शिवाय कुपोषित बालकांच्या मातांना बुडीत मजुरी म्हणून बालक भरती असेपर्यंत प्रतिदिन १०० रुपयेही देण्यात येत होते.