शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

२००५ पासून वाढतेय महिला पोलिसांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:23 IST

पोलिसांचे क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठीच असते. महिला त्या क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी सर्रास बोलले जायचे. आजही काही लोकांचा हा समज आहे. मात्र २००५ पासून महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय वाढली असल्याचे दिसून येते. यामध्येही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देमहिला सक्षमता : महाराष्ट्र पोलीस वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुली ठरताहेत अव्वल

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलिसांचे क्षेत्र हे फक्त पुरुषांसाठीच असते. महिला त्या क्षेत्रात टिकाव धरू शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी सर्रास बोलले जायचे. आजही काही लोकांचा हा समज आहे. मात्र २००५ पासून महाराष्ट्र पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या क्षेत्रांमध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय वाढली असल्याचे दिसून येते. यामध्येही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.२०१५ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात सर्वात जास्त महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलात महिलांना देऊ केलेले तीस टक्के आरक्षण हा यामागचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात. मात्र नोकरी मिळाल्यानंतरही महिलांमध्ये मुळातच असलेली जिद्द आणि कामाप्रतीची निष्ठा, यामुळे या क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा जास्त टिकाव धरू शकतात, असे बोलले जाते. महाराष्ट्रातील महिला पोलिसांचे प्रमाण एकूण पोलीस संख्येच्या १०.४८ टक्के एवढे आहे. यातही महिला पोलीस अधिकाºयांपेक्षा पोलीस कर्मचाºयांंची संख्या अधिक आहे. हे गुणोत्तर १:२३ एवढे जास्त आहे. पोलिसांची नोकरी त्रासदायक असते, वेळा निश्चित नसल्याने महिला ती नोकरी करून कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. प्रचंड धावपळ असल्याने महिलांना पोलीस क्षेत्रात काम करणे अवघड जाते, त्यामुळे अनेकदा पालकही आपल्या मुलीला या क्षेत्रात येऊ देण्यासाठी फारसे खुश नसतात. मात्र आता आत्मविश्वासपूर्वक कार्य करणाºया महिला पोलिसांकडे पाहून अनेक पालकांचे आणि युवतींचे मतपरिवर्तन होत असून, या क्षेत्रातील युवतींची संख्या वाढते आहे.महिलांसाठी उत्तम करिअरमागच्या काही वर्षांपासून पोलीस दलात भरती होणाºया महिलांचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. या क्षेत्रात काम करणाºया महिलांकडे पाहून हे क्षेत्र दिसते तेवढे खडतर नसल्याचे मुलींना कळते. त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज साहजिकच दूर होतो. महिलांसाठी हे एक चांगले क रिअर ठरत आहे.- वैशाली धाटे- घाटगे, पोलीस उपायुक्तग्रामीण भागातील मुली अव्वलग्रामीण भागातील अनेक मुली आज महिला पोलीस म्हणून सक्षमपणे कार्य करीत आहेत. शारीरिक श्रम करण्याची सवय असल्यामुळे शहरी मुलींपेक्षा ग्रामीण भागातील मुली अधिक काटक असतात. त्यामुळे निवड प्रक्रियेदरम्यान असलेल्या शारीरिक क्षमता चाचणीत फारसे श्रम न घेताही त्या अव्वल ठरतात. या क्षेत्रात अजूनही मुलींना भरपूर वाव आहे.- वैशाली पाटील, संचालिका, पोलीस- सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था