शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

औरंगाबादमध्ये अपु-या शहर बसमुळे सहा वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:36 IST

शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

ठळक मुद्देशहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादने स्मार्ट सिटीत पाऊल टाकले आणि शहराच्या विकास, विस्ताराची चाके गतिमान झाली. परंतु गेल्या काही वर्षांत शहर बसची ‘चाके ’ जाम झाली आहेत. शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

शहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. औरंगाबाद शहराचा आज चारही बाजूंनी विस्तार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक अंतर ये-जा करावी लागते. तासन्तास थांबूनही शहर बस येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांचा वापर केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वाहन खरेदीकडे कल वाढला. 

आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे. यामध्ये शहरातील वाहनांची नोंद सर्वाधिक आहे. शहर बससेवा समक्ष असेल तर किफायतशीर प्रवासाला प्राधान्य दिल्या जाते. परंतु गेली अनेक वर्षे शहर बसची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात खाजगी वाहतुकीचा वापर करणे अनिवार्यच झाले. त्यातून शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातून रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणाचाही ताण वाढला.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी करून दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची संख्या वाढीला एकप्रकारे हातभार लावण्यात आला. गेली अनेक वर्षे हेतूपुरस्सर शहर बससेवा सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झाले. शहर बससेवा अपुरी असल्याने आता आणखी एका नव्या प्रकारचे प्रवासी वाहन शहरात दाखल होत असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावरील खर्च वाढला आहे. औरंगाबादेत दररोज सुमारे ३ लाख लिटर पेट्रोल तर सुमारे २ लाख डिझेलची विक्री होते, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी दिली. दुचाकी, रिक्षांमध्ये इंधन विक्रीचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे शहर परिसराचे वातावरण प्रदूषित होण्यासही हातभार लागत आहे. 

सहा वर्षांत दुपटीने वाढ२००९-१० यादरम्यान जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार २७ इतकी होती. अवघ्या सहा वर्षांत ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील वाहनांची संख्या ११ लाख २ हजार ४४४ वर जाऊन पोहोचली. त्यानंतर एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान ७३ हजार वाहनांची भर पडली. तर एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ६० हजार ९३६ नव्या वाहनांची भर पडली आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या शहरातील रस्त्यांवर ७ लाखांवर वाहने धावत आहेत.