शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छावणी गणेश महोत्सव ठरतोय नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:05 IST

बहुरंगी व बहुढंगी कार्यक्रमांसह मैदानी स्पर्धा आणि आखीव-रेखीव आयोजनाने छावणी गणेश महासंघाचा ‘छावणी महोत्सव’ सर्वत्र गाजतो आहे. हा महोत्सव दररोज गर्दीचा नवीन विक्रम नोंदवितो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बहुरंगी व बहुढंगी कार्यक्रमांसह मैदानी स्पर्धा आणि आखीव-रेखीव आयोजनाने छावणी गणेश महासंघाचा ‘छावणी महोत्सव’ सर्वत्र गाजतो आहे. हा महोत्सव दररोज गर्दीचा नवीन विक्रम नोंदवितो आहे.राजकारणविरहित संघटना व पदाधिकाºयांमध्ये वेगळे काही तरी करून दाखविण्याची जिद्द असेल तर काय घडू शकते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण छावणीचा महोत्सव ठरतो आहे. अवघ्या ५१ गणेश मंडळांचे नेतृत्व करणाºया छावणी गणेश महासंघाने यंदा उत्कृष्ट महोत्सव घेऊन जिल्ह्यातील अन्य गणेश महासंघासमोर आदर्श निर्माण केला आहे. २५ हजार स्क्वेअर फुटांचा डोम व ३० बाय ५० फुटांचे भव्य रंगमंच, एकाच वेळेस ५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था, यावरून या महोत्सवाची भव्यदिव्यता लक्षात येते. सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाने या महोत्सवाला सुरुवात झाली. रतन गवळे यांचा आॅर्केस्ट्रा, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाने तर महोत्सवाची चर्चाच घडविली. हास्यकवी मिर्झा बेग, नीलेश चव्हाण, ध.सु. जाधव, अविनाश भारती यांनी सादर केलेल्या विडंबन कवितांनी सर्वांना हसवून-हसवून लोटपोट केले. बुधवारी सादर झालेल्या ‘बायांनो नवरे सांभाळा’ या विनोदी नाटकाने गर्दीचा विक्रम नोंदविला. एवढेच नव्हे तर मैदानात ‘गिल्ली दंडा’ स्पर्धा घेऊन जुन्या खेळांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. गुरुवारी मुले व मुुलींचा हॉकी सामनाही येथे रंगला. तसेच सायंकाळी ‘कुस्तीची दंगल’ पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. शनिवारी (दि.२) सांस्कृतिक कार्यक्रम, तर ३ तारखेला हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मागील ७ दिवसांत ‘जरा हटके’ सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव मूळ संकल्पनेकडे वळविला आहे.