शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

छावणीत गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या नऊशेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:18 IST

छावणी परिसराला गॅस्ट्रोने अक्षरश: विळखा घातला असून, दुस-या दिवशी रविवारी (दि.१२) देखील छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचा ओघ दिवसभर सुरूच होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी परिसराला गॅस्ट्रोने अक्षरश: विळखा घातला असून, दुस-या दिवशी रविवारी (दि.१२) देखील छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांचा ओघ दिवसभर सुरूच होता. रुग्णांचा आकडा तब्बल ९३८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे. रुग्णांच्या संख्येमुळे लष्कर, घाटी रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मनपाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रुग्णांची संख्या अधिक असली तरी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले.उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने छावणी परिसरातील शेकडो रहिवाशांनी एकाच वेळी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतल्याने शनिवारी खळबळ उडाली. अचानकपणे रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली. गर्दीमुळे प्रचंड त्रास सहन करीत रुग्णांना उपचारासाठी रांगेत ताटकळावे लागले. दिवसभरात २५० वर रुग्णांवर उपचार करण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत सुरू असलेला रुग्णांचा हा ओघ दुस-या दिवशीही कायम होता. रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली. रुग्णांची गर्दी वाढतच राहिल्याने लष्कर, घाटी रुग्णालय आणि महापालिकेच्या पथकला पाचारण क रण्यात आले. रुग्णांच्या संख्येमुळे शनिवारी अनेकांना मिळेल त्या जागेवर उपचार घ्यावे लागले. ही परिस्थिती लक्षात घेऊन काही व्यक्तींनी पुढाकार घेऊन रुग्णालयाच्या परिसरात मंडप आणि खाटा उपलब्ध करून दिल्या.रुग्णांबरोबर नातेवाईकांची रुग्णालयात एकच गर्दी झाली. उपचारासाठी एकमेकांना मदत करण्यात येत होती. त्याच वेळी उद््भवलेल्या परिस्थितीला छावणी परिषद जबाबदार असल्याचे म्हणत नागरिकांकडून संताप व्यक्त होत होता.