पहिल्या लाटेत तालुक्यात दोन हजार ८१९ रुग्ण आढळून आले होते. पैकी ७३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर असतांना फेब्रुवारीत विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली होती. दुसऱ्या लाटेतील भयंकर विषाणू अधिक वेगाने सक्रिय झाल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेत कोरोनाने ४ हजार ७२४ रुग्णांना आपल्या विळख्यात घेतले. पैकी ४ हजार ५०२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले, तर १२५ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला व सध्या ९७ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे, तर पॉझिटिव्ह दर १० टक्क्यांच्या आत आला आहे. रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून, नागरिकांनी हलगर्जीपणा न करता नियमांचे पालन करून तालुका कोरोनामुक्त करण्यास हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
गंगापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:04 IST