शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

शासनाच्या तिजोरीवर डल्ला!

By admin | Updated: November 17, 2015 00:28 IST

गंगाराम आढाव , जालना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभाराचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. शिफारशीपेक्षा दहापटीने वर्कआर्डर दाखवून

गंगाराम आढाव , जालनासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभाराचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. शिफारशीपेक्षा दहापटीने वर्कआर्डर दाखवून त्याआधारे कामांची देयक काढून शासनाच्या तिजोरीवर राजरोसपणे डल्ला मारण्यात आला. तरीही संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी गप्पच आहेत. चौकशी अहवालही शासनदरबारी न पाठविता तो विभागीय कार्यालयातच दडवून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यासर्व प्रकारामागे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व गुत्तेदारांची मोठी साखळी कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणाची तसेच अन्य कामांची सखोल चौकशी झाल्यास शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांचे पितळ उघडे पडेल.जालना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरुन त्या कामांची चौकशी करण्यात आली होती. तसेच काही कामांची शिफारस पत्रे व वर्कआर्डरची पडताळणी करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक जालना यांनी केलेल्या दहा कामांच्या पडताळणीत कामांच्या शिफारस पत्रावरील रक्कमेच्या पाचपट रक्कमेचे वर्कआर्डर संबंधित गुत्तेदाराच्या एजन्सीला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यात वालसावंगी- पारध- पिंपळगाव रेणुकाई, दानापूर- भोकरदन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिफारस पत्रावर २ लाखांची रक्कम असताना वर्कआर्डर ९ लाख ९८ हजार ३० रुपयांचे देण्यात आले. याच प्रमाणे फुलंब्री- तळेगाव राजूर रस्ता दुरुस्तीसाठी २ लाख ९५ हजारांचे काम असताना ९ लाख ९४ हजार १३३ रुपयांची वर्कआर्डर देण्यात आली. फुलंब्री ते राजूर रस्ता दुरुस्तीसाठी १ लाख ९५ हजारांची वर्कआर्डर ९ लाख ९६ हजार ४९६ रुपयांचे, सिल्लोड-भोकरदन - जाफराबाद रस्ता दुरुस्तीसाठी १ लाख ५० हजाराचे शिफारसपत्र वर्कआर्डर दिले. ९ लाख ९७ हजार १ रुपयांचे, भोकरदन येथील दिवाणी न्यायालय युरिनस ब्लॉकची दुरुस्तीचे शिफारसपत्र २ लाखांचे वर्कआर्डर दिले ९ लाख ९४ हजार ७७० रुपयांचे, भोकरदन पोलिस ठाण्यातील स्वच्छतागृहाची दुरुस्तीसाठी शिफारसपत्र २ लाखांचे वर्कआर्डर दिली. ४ लाख ९९ हजार ३२६ रुपयांचे, जिल्हा कारागृह ग्रेड १- अंतर्गत पेट्रोलिंग रोडसाठी १ लाख ९९ हजारांचे शिफारस पत्र असताना वर्क आर्डर ९ लाख ९६ हजार ९७९ रुपयांचे देण्यात आले. जालना नर्सिंग कॉलेज कॅम्प बोर्ड दुरुस्ती व फस्ट फलोअर आॅफ हॉस्टेल दुरुस्तीसाठी ५ लाखोचे शिफारसपत्र असताना १० लाखांची वर्कआर्डर देण्यात आली. महिला रुग्णालय जालना येथील वॉटर सप्लाय सेनेटरी अ‍ॅरेजमेंटचे ४ लाखांचे शिफारस पत्र असताना वर्कआर्डर ९ लाख ९९ हजार ५० रुपयांची देण्यात आले. विशेष म्हणजे ही सर्व कामे एकाच संस्थेला देण्यात आली,हे विशेष.!