लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील अनेक वर्षांपासून नगरपालिका अधिकारी, कर्मचाºयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त अधिकारी, कर्मचाºयांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी एकदिवसीय संप केला. जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व नगरपंचायतमध्ये हा संप पुकारण्यात आला होता.राज्यातील नगरपालिका, नगर पंचायतीमधील मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, संप पुकारण्यात आला; परंतु शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बुधवारी एकदिवसीय संपावर जाण्याचा निर्णय पालिका अधिकारी, कर्मचाºयांनी घेतला.बीडमध्ये न.प.समोर ठिय्याबीड येथील नगर परिषदेसमोरही पालिका अधिकारी, कर्मचाºयांनी सकाळपासूनच ठिय्या आंदोलन केले. यामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावरही शासन नमले नाही तर २१ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.माजलगावात धरणेमाजलगाव नगर परिषदेतील सर्वच कर्मचाºयांनी सामुहिक रजा टाकली. पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सुर्यकांत सुर्यवंशी, बाबासाहेब भिसे, भगवान कांबळे, सुधाकर उजगरे, निसार पठाण, प्रकाश शिंदे, प्रल्हाद वक्ते, विलास मडकर, राम मिसाळ, भुजंग गायकवाड, अभिमान टाकणखार, लक्ष्मण, कांबळे, मिरा आलझेंडे, चंद्रकला जावळे, सुभाष वाघमारे, विशाल शिंदे, चंद्रकांत बुलबुले, हमीद बागवान, अतुल तोंडारे, प्रकाश ईके, शिवाजी देशमुख, गोविंद साबळे आदींची उपस्थिती होती.परळीतही मांडला ठिय्यामहाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती व इतर सर्व नगर पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर परिषद कर्मचाºयांना ७ वा वेतन आयोग लागू करा, समान कामाला समान वेतन द्या, रोजंदारी कर्मचाºयांना कायम करा या प्रमुख मागण्यासह इतर मागण्यासाठी २१६ कर्मचाºयांनी परळी न.प.कार्यालयासमोर सामुहिक रजा टाकून पालिकेसमोर ठिय्या मांडला. यादरम्यान न.प. कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. परळी नगर परिषद कर्मचारी यूनियनचे अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, उपाध्यक्ष शंकर साळवे, सरचिटणीस किरण सावजी, राजाभाऊ जगतकर, व्ही.बी दूबे, प्रियदर्शन ताटे, विजयकुमार कांबळे, बविता डबडे, राजाभाऊ ताल्डे, वंदना मस्के आदींची यावेळी उपस्थिती होती.गेवराईतही उत्स्फूर्त सहभागगेवराई नगर परिषदेतील कर्मचाºयांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी आर. व्ही .पंडीत,बी .सी. भंडारी, कैलास मडकर ,पी .एम दोडके,प्रकाश माने,एकनाथ लाड, एन.बी .मस्के,जी .झेड. ईनामदार, टी .के निकम , आर. आर. बोर्डे, प्रकाश रानमारे, सह न.प.कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.पाटोदा नगर पंचायतमध्येही आंदोलनपाटोदा नगरपंचायतमधील अधिकारी, कर्मचाºयांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांनी काम बंद आंदोलन करत नगरपंचायतसमोर ठिय्या मांडला. आंदोलनात मुख्याधिकारी नीलिमा कांबळे, विठ्ठल रूपनर, सचिन जावळे, काकासाहेब जाधव, प्रमोद पांडे, महेश भाकरे, श्रीमंत जावळे, सुनील शिंदे आदी कार्यालयीन कर्मचारी, सफाई कामगार यांनी सहभाग नोंदवला .केजमध्येही आंदोलनकेज नगरपंचायतीच्या कर्मचाºयांनीही नगरपंचायत कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले. शाम कदम, भास्कर ससाणे, अनिल राऊत यांच्यासह ६० महिला, पुरु ष कर्मचारी सहभागी झाले होते.शिरुरमध्ये कामबंदशिरुर नगर पंचायत कार्यालयातही कामबंद आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात भास्कर गाडेकर, नंदकुमार भांडेकर, जगदीश तगर, नामदेव घुगे, संजय गायकवाड, भाऊसाहेब मोरे, सुनील शेटे, दीपक गवळी, अक्षय सुरवसे, हबीब शेख, चतुरा शिंदे, राहीबाई चांदने, सरुबाई चांदने, रामदादा जोगदंड, शहादेव गायकवाड, अप्रूगा मुरगुंड, शहाबाई मोरे यांचा समावेश होता.
न.प. अधिकारी, कर्मचाºयांचे सामूहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 21:46 IST