शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता काय होणार जनावरांचे, फक्त दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:16 IST

जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक असला तरी फेब्रुवारीपासून मात्र, चाराटंचाईचा सामना करावा लागेल.

ठळक मुद्देवैरणविकास योजना : औरंगाबाद जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार पशुधन

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक असला तरी फेब्रुवारीपासून मात्र, चाराटंचाईचा सामना करावा लागेल. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ लाख ७६ हजार पशुधनासाठी महिन्याला १ लाख ५ हजार मेट्रिक टन, तर दररोज साडेतीन हजार मेट्रिक टन चाऱ्याची गरज जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकाºयांकडे नोंदविली आहे.जिल्ह्यातील बहुतांशी कोल्हापुरी बंधारे, लघु व मध्यम प्रकल्प, विहिरी आदी पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. पावसाने पाठ फिरवल्यामुळे हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके करपून गेली. रबीची पेर करण्यास शेतकºयांचे धाडस झाले नाही. त्यामुळे साधारणपणे फेब्रुवारीपासून पुढे चारा व पाणीटंचाई जाणवणार आहे.दरम्यान, प्रशासनामार्फत टंचाईची तीव्रता कमी करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून वैरणविकास योजनेंतर्गत चारालागवडीवर भर दिला जात आहे. या योजनेंतर्गत पशुपालक -शेतकºयांना मका, बाजरी, ज्वारी व ठोंबे आदी वाटप केले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी २९ लाख रुपयांचे पॅकेज शासनाने मंजूर केले आहे. यामध्ये पशुपालक- शेतकºयांना मक्याचे ५ किलो, तर ज्वारीचे ४ किलो बियाणे दिले जाणार आहे. ज्या पशुपालक-शेतकºयांच्याकडे किमान १० गुंठे जमीन व सिंचन सुविधा उपलब्ध आहे, त्यांना १०० टक्के अनुदानावर ही वैरण, बियाणे व खतांसाठी अनुदान दिले जाणार आहे. साधारणपणे जिल्ह्यात या माध्यमातून ५ मेट्रिक टन सकस हिरवा चारा उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.चौकट ....लाभार्थी शेतकºयांना देणार ४ हजार ६०० रुपये अनुदानदुष्काळसदृश परिस्थितीमध्ये पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध व्हावा, तसेच त्याची रोगप्रतिकारशक्ती, प्रजनन क्षमता कायम राहावी, यासाठी वैरणविकास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत दहा गुंठ्यांवर ज्वारी, बाजरी अथवा मक्याच्या बियाणापासून सकस चारा निर्माण करणाºया शेतकºयांना एका हेक्टरसाठी ४ हजार ६०० रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी जे शेतकरी खतांचा वापर करतील, त्या शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारdroughtदुष्काळ