शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तुमच्या लाडक्या टॉमी, मोतीचा काढा आता 'थर्ड पार्टी विमा'; आजार, हरविल्यास मिळते भरपाई

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 14, 2024 11:36 IST

आता लाडक्या श्वानालाही विम्याचे संरक्षण दिली जात असल्याने ही आधुनिक ‘भूतदया’ होय.

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील रहिवासी विजय वर्मा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सोनेरी रंगाचे ‘लॅब्राडोर’ जातीचे ‘टॉमी’ नावाचे लाडके श्वान आहे. नुकताच वर्मांनी आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा काढला. त्यांना तेव्हा कळाले की, ‘टॉमी’चाही विमा काढता येतो. त्यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता करून त्याचाही विमा काढला.

श्वानांचाही ‘आरोग्य विमा’ आता उतरविला जात आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण आता लाडक्या ‘टॉमी’लाही विम्याचे संरक्षण दिली जात असल्याने ही आधुनिक ‘भूतदया’ होय. त्याच्यावर घरातील सर्व सदस्य जिवापाड प्रेम करतात.

पीईटी डॉग इन्शुरन्स पॉलिसीपाळीव प्राण्यांसाठी विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसी आहेत. ‘पीईटी डॉग इन्शुरन्स पॉलिसी’ म्हणून त्यांना नाव देण्यात आले आहे. श्वानांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यांच्या खाण्यावर, देखभालीवर मोठा खर्च केला जातो. तो आजारी पडू शकतो. त्यावर उपचार, शस्त्रक्रिया होऊ शकते. तो हरवू शकतो. अशावेळी पॉलिसी कामाला येते.

... मिळते विम्याची रक्कमविमा काढलेला श्वान आजारी पडला, त्याचा अपघात झाला. शस्त्रक्रिया झाली, तो चोरीला गेला, तर त्याची भरपाई श्वानमालकाला मिळते. श्वानाचा मृत्यू झाल्यावर त्यास दफन करण्यासाठी लागणारी रक्कम मिळते.

थर्ड पार्टी लॅबिलिटीवाहनांचा अपघात झाला तर थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळतो तसेच पाळीव श्वानाने बाहेरील व्यक्तीला किंवा लहान मुलावर हल्ला केला. चावलेल्यास रेबीज झाला, उपचारासाठी लागणारा खर्च किंवा ती व्यक्ती दगावली तर श्वान मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो. श्वानाचा विमा काढलेला असेल तर ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ने समोरील व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळू शकते.

किती असतो विमा ?१) बाजारात श्वान विकले जातात, त्याची किंमत विमा कंपनी ग्राह्य धरत नाही.२) देशी श्वानापासून ते विदेशी श्वानांपर्यंत सर्वांची किंमत विमा कंपनीने ठरविते.३) विमा हप्त्याची रक्कम ही पाळीव प्राण्याचा प्रकार, वय, जात यानुसार किती प्रकारच्या रकमेचे संरक्षण हवे आहे. यावर ठरविली जाऊ शकते.४) श्वानांचा विमा १ वर्षापासून १० वर्षांपर्यंतचा निघतो. ५) उदा. २ वर्षाच्या डॉबरमॅनची किंमत कंपनीने ६० हजार ठरविलेली आहे. त्यास वार्षिक विमा साडेसात ते ८ हजार रुपयांत काढला जातो.

आजाराचा समावेश होत नाहीविमा कोणत्या परिस्थितीत मिळत नाही? गरोदरपणा हा आजार नसतो, मादी श्वानाच्या गरोदरपणाचा खर्च किंवा आजार झाला तर विमा रक्कम मिळत नाही. काहीजण मादी श्वान आणून तिच्याकडून होणारी पिल्ले विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे याचा विमा काढला जात नाही. पॉलिसी काढण्याआधी श्वानाला काही आजार असेल तर त्याचा विम्यात समावेश होत नाही.- प्रदीप सोनटक्के, टीम लीडर (विमा कंपनी)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdogकुत्रा