शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता अगरबत्तीतून निघतोय महागाईचा धूर; किंमत वाढविण्याऐवजी संख्या घटवली

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 29, 2022 19:45 IST

भाववाढीमुळे व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही अगरबत्ती उत्पादकांनी किमती वाढविण्याऐवजी पुड्यातील अगरबत्तीची संख्या कमी केली.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : श्रावणाला सुरुवात होत असताना देवासमोर लावण्यात येणाऱ्या अगरबत्तीतून सुगंधाऐवजी महागाईचा धूर निघत आहे. कारण, अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरले जाते त्या केमिकल व अन्य कच्चामालाचे भाव वाढले आहेत. याचा हा परिणाम आहे. जास्त पैसे मोजावे लागत असल्याने अगरबत्तीचा सुगंध नागरिकांसाठी महागाईचा धूर बनला आहे.

तसे वर्षभर अगरबत्तीची विक्री होत असते. देवघरात सकाळ-संध्याकाळ अगरबत्ती लावली जाते तसेच मंदिर, दुकानात अगरबत्ती लावली जाते. अगरबत्ती लावल्यावर सर्वत्र सुगंध पसरतो. हा सुगंधच ग्राहकांना अगरबत्ती खरेदीच्या मोहात टाकतो.

अगरबत्ती पुड्याच्या भावात किती वाढ झालीग्रॅम (वजन) जून जुुलै१) १५ ग्रॅम ५ रु. - ७ रु.२) ३० ग्रॅम १०रु. - १२ रु.३) १०० ग्रॅम ५० रु.- ६० रु.४) २२५ ग्रॅम २००रु.- २२० रु.

किमती त्याच ठेवल्या अगरबत्ती संख्या घटवलीभाववाढीमुळे व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही अगरबत्ती उत्पादकांनी किमती वाढविण्याऐवजी पुड्यातील अगरबत्तीची संख्या कमी केली. जो अगरबत्ती पुडा आधी १५० ग्रॅम वजनाचा होता तो आता १२० ग्रॅम वजनाचा करण्यात आला असून त्याची किंमत ७० रुपये स्थिर ठेवण्यात आली. १०० ग्रॅमचा पुडा ८५ ग्रॅम करण्यात आला व त्याची किंमत ६० ते ७० रुपये दरम्यान स्थिर ठेवली.

दररोज १० लाखांची उलाढालशहरात वर्षभर अगरबत्ती विकली जाते. त्यात श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत दररोज अगरबत्तीच्या विक्रीची सुमारे १० लाखांची उलाढाल होते.

का महागली अगरबत्तीअगरबत्ती तयार करण्यासाठी डिपिंग ऑईल वापरले जाते. आधी या ऑईलची किंमत १४० ते १५० रुपये प्रतिलिटर होती. ती वाढून आता २०० ते २१० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अगरबत्तीसाठी लागणारे लाकूड विदेशातून येते. त्याचेही भाव वाढले. एकूणच कच्चामालाचे भाव वाढल्याने अगरबत्तीच्या किमतीवरही परिणाम झाला.

कच्चा मालावरील जीएसटीत ७ टक्क्यांची वाढअगरबत्तीवर ५ टक्केच जीएसटी आकारला जातो. मात्र, अगरबत्तीसाठी लागणाऱ्या रसायनावर पूर्वी ५ टक्के जीएसटी होता तो वाढून १२ टक्क्यांपर्यंंत पोहचला आहे. ७ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचा परिणाम अगरबत्ती तयार करण्यावर झाला.- अनिलकुमार भंडारी, अगरबत्ती वितरक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार