शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आता पायी वारी थांबवावी,मीच तुझ्या गावी येत आहे';आव्हाणे गावात आहे निद्रिस्त गणपतीची स्वयंभू मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 17:54 IST

गणेश जयंती विशेष स्टोरी : देशातील बहुधा एकमेव, पैठणपासून ३० कि.मी.वर निद्रिस्त स्वयंभू मूर्ती

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती गणरायाची असंख्य रुपे आपण पाहिली असतील. मात्र, झोपलेला गणपती अशी कल्पनाही कधी मनात आली नसेल. कारण गणपती म्हणजे मांडी घालून बसलेला हेच डोळ्यासमोर येते. पण चिरेबंदी मंदिरात झोपलेल्या गणपतीचे दर्शन तुम्हाला घडले तर? ही कल्पना नव्हे. पैठणपासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर आव्हाणे नावाच्या गावातील मंदिरात स्वयंभू निद्रिस्त गणेशाचे दर्शन भक्तांना घडत आहे. हे मंदिर देशातील एकमेव असावे.

खुलताबादचा भद्रा मारुती झोपलेल्या अवस्थेत आहे. तशाच झोपलेल्या गणपतीचे दर्शन आव्हाणे गावात घडते. राज्य शासनाने २००५ मध्ये या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्रांच्या यादीत केला. पैठणपासून शेवगावकडे जाताना १३ कि.मी.अंतरावर आव्हाणे (बुद्रूक) हे गाव लागते. येथे शासनाने दिलेल्या ४४ लाखांच्या निधीतून चिरेबंदी मंदिर उभे राहिले. मंदिरात मध्यभागी जमिनीपासून तीन फूट खोल ही मूर्ती आहे. ‘तीन बाय अडीच फुटांची व शेंदूरी रंगातील; तीही उत्तरमुखी आहे. मूर्ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे सांगतात. या मंदिरात तीन गणरायांचे भक्तांना दर्शन होते. एक निद्रिस्त गणपती, त्याच्या पाठीमागे भिंतीमध्ये मयुरेश्वराची मूर्ती व बाजूच्या मंदिरात रिद्धी, सिद्धी सोबत गणराय अशा तीन मूर्ती जवळजवळ आहेत. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून मूर्तीला सोन्याचा मुकुट तयार केला.

दादोबा, गणोबा गणेश मूर्तीनिद्रिस्त गणेश मंदिराचे पुजारी काकासाहेब भालेराव यांनी आख्यायिका सांगितली की, आव्हाणे गावात पूर्वी दादोबा नावाचे गणेशभक्त राहत होते. ते दरवर्षी न चुकता गणेश जयंतीला मोरगावला मोरेश्वराच्या दर्शनासाठी पायी जात असत. नंतर वृद्धापकाळात वयोमानामुळे ही वारी त्यांना झेपेनाशी झाली. त्यावेळी दादोबांना दृष्टांत झाला की, ’आता पायी वारी थांबवावी, मीच तुझ्या गावी येत आहे’. दादोबांच्या निधनानंतर आव्हाणे गावात एक शेतकरी नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ टणक वस्तूला लागला. खोदले असता गणपतीची निद्रिस्त स्वयंभू मूर्ती दिसली. गणोबांना दृष्टांत झाला की, ही मूर्ती जशी आहे तशीच राहू दे. भाविकांनी निद्रिस्त गणपतीला ‘दादोबा’ तर बाजूला रिद्धी, सिद्धी सोबत असलेल्या मूर्तीला‘ गणोबा’ असे नाव दिले.

गणेश जयंतीला गावातील भाविक जातात मोरगावालादादोबा देवांचा वसा आव्हाणे गावातील गावकऱ्यांनी जपला आहे. दरवर्षी गणेश जयंतीला गावातील युवक मोरगावला जाऊन मोरेश्वराचे दर्शन घेतात.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादganpatiगणपती