शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पाणंदमुक्तीसाठी आता गावात मुक्काम

By admin | Updated: February 18, 2016 23:42 IST

हिंगोली : स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये गुडमॉर्निंग पथक मुक्कामी राहणार आहे.

हिंगोली : स्वच्छ भारत मिशनतंर्गत हागणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये गुडमॉर्निंग पथक मुक्कामी राहणार आहे. पुन्हा ही पथके कार्यान्वित झाल्याने आता नागरिकांना उघड्यावर जाणे महागात पडणार आहे.हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात स्वच्छता अभियानातील कामाची गती हरवली होती. आता पुन्हा एकदा हा विभाग जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे. गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित करून वसमत तालुक्यातील काही गावांत मुक्काम करण्यात आला होता. तेथे सकाळी उघड्यावर जाणाऱ्यांना या पथकातील कर्मचारी अडवून लोटा ताब्यात घेत आहेत. शिवाय त्यांचे तेथेच प्रबोधन केले जात आहे. अनेकांनी या पथकाची धास्ती घेतली. अनेकांनी निमूटपणे शौचालय बांधकामच सुरू केल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथकामुळे होत असलेला परिणाम लक्षात घेता पाचही पंचायत समितीअंतर्गत येणारी ७३ गावे शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी गुडमॉर्निंग पथक नेमण्यात आली आहेत. गावात स्वच्छतागृहाची सुविधा असूनही वापर होत नाही. त्यामुळे दंडाची कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी गृहभेटी घेऊन कुटुंबाशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले जाणार आहे. तसेच गावातील उर्वरित वैयक्तिक स्वच्छतागृहांचे बांधकाम व त्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील आठवड्यात गुडमॉर्निंग पथके गावात धडकणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिली. (प्रतिनिधी)