शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आता तलाठ्यांवर एसडीएम कारवाई प्रस्तावित करणार; जिल्हाधिकारी घेणार अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:34 IST

झीरो तलाठ्यांचे वर्चस्व संपुष्टात आणा, त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर थेट तलाठ्यांवरच निलंबनाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मंडळ अधिकारी, तलाठ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आता उपविभागीय अधिकारी (एसडीएम) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. त्यावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. तसेच झीरो तलाठ्यांचे वर्चस्व संपुष्टात आणा, त्यांच्याबाबत तक्रारी आल्यानंतर थेट तलाठ्यांवरच निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला. महसूल प्रशासन लाचखोरीमुळे बदनाम होत चालले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी गुरुवारी महत्त्वाचे अलर्ट यंत्रणेला दिले आहेत.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना फैलावर घेतले. १० जूनपर्यंत सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढा. झीरो पेंडन्सीचे प्रमाणपत्र संबंधितांकडून विभागप्रमुखांनी घ्यावे. प्रत्येक कार्यालयात तक्रारपेटी लावण्यात यावी. ३ जूनपर्यंत पेट्या लागल्या पाहिजेत. दर सोमवारी एसडीएमने व्हिडीओ शूटिंग करत, (इन कॅमेरा) ती कुलूप बंद पेटी उघडून तक्रारी निकाली काढाव्यात. जिल्हाधिकाऱ्यांकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार असल्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाई करता येत नाही, असे परखड मत उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडील कारवाई प्रस्तावित करण्याचे अधिकार आता एसडीएमकडे वर्ग करण्यात आले आहेत. बदल्या समुपदेशनाने करण्यात येतील. दरमहा एक तारखेला तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

...तर निलंबन अटळ समजाकुणाच्याही कार्यालयात खासगी व्यक्ती दिसली तर सामान्यांनी तक्रारी कराव्यात. जिल्ह्यात कुणाच्या कार्यालयात खासगी व्यक्ती आढळून आली तर कारवाई होईल. तसेच विशेषत: तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खासगी व्यक्ती दिसली, ते सामान्यांना उद्धटपणे बोलत असतील, अशा तक्रारी आल्यास तलाठी, मंडळ अधिकारी निलंबित होतील.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागcollectorजिल्हाधिकारी