शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आता मका, सुपारीच्या पानांच्या पत्रावळ्या बाजारात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 19:22 IST

औरंगाबाद : सिल्व्हर कोटेड पत्रावळी, प्लास्टिकच्या ग्लासवर बंदी आल्याने आता विक्रेत्यांनी पर्याय शोधणे सुरूकेले आहे. येत्या १५ दिवसांत मक्याच्या ...

औरंगाबाद : सिल्व्हर कोटेड पत्रावळी, प्लास्टिकच्या ग्लासवर बंदी आल्याने आता विक्रेत्यांनी पर्याय शोधणे सुरूकेले आहे. येत्या १५ दिवसांत मक्याच्या पानापासून बनलेल्या पत्रावळी बाजारात आणण्यात येणार आहेत. मात्र, या पत्रावळी महाग असल्याने त्या किती प्रमाणात स्वीकारल्या जातील, याबाबत शंका आहे.    

श्रावण महिन्याला १२ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर सणासुदीला सुरुवात होत आहे. उपवास, भंडारा असे विविध धार्मिक कार्यक्रम चातुर्मासात असणार आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण त्यानंतर आहेत. यानिमित्ताने पत्रावळी व ग्लासला मोठी मागणी राहणार आहे. पूर्वी बदामाच्या पानाच्या पत्रावळी विकल्या जात नंतर त्या पत्रावळी शिलाई करून येऊ लागल्या होत्या; पण नंतर त्याची जागा सिल्व्हर कोटेड व थर्माकोलच्या प्लेटने घेतली. 

आता, प्लास्टिक व थर्माकोलवर राज्य सरकारने बंदी आणली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आता नवीन पर्यायी शोधणे सुरू केले आहे. सिल्व्हर कोटेड पत्रावळीऐवजी आता मक्याच्या पानाची पत्रावळी तसेच सुपारीच्या पानाची पत्रावळी बाजारात दाखल होत आहे. ६ ते ९ रुपये प्रतिनग, अशी या पत्रावळीची किंमत आहे. यासाठी स्वस्त असणाऱ्या बदामाच्या पानाच्या पत्रावळी मागविण्यावर व्यापाऱ्यांचा भर दिसून येतो. मात्र, संपूर्ण राज्यातून या पत्रावळीला मागणी वाढल्याने ओडिसात बदामाच्या पत्रावळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कागदाच्या ग्लासला चांगली मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

केळीच्या पानालाही येणार भाव शहरात खान्देशातून केळीची पाने विक्रीसाठी येत असतात. घरगुती धार्मिक कार्यात आवर्जून केळीची पाने मागविली जातात. श्रावणात मोठ्या प्रमाणात केळीची पाने शहरात येत असतात. यावेळी केळीची पानेही महाग होतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. 

रद्दीचे भाव वाढले कॅरिबॅगवर बंदी आहे. हँडल नसलेल्या किराणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॅगवर बंदी आहे की नाही, याविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक बॅगवरही कारवाई करणार का, याविषयी मनपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक किराणा दुकानदारांनी आज पेपरच्या पुड्यात किराणा सामान बांधून देणे सुरू केले होते. त्यामुळे रद्दीला मागणी वाढली. १० किलोची रद्दी २५० रुपयांना विकली जात होती. २५ रुपये किलोपर्यंत रद्दीचा भाव गेला होता. काही व्यापाऱ्यांनी तर शहराबाहेरील रद्दीवाल्यांकडे फोन लावून रद्दी काढून ठेवण्यासाठी आॅर्डर दिली. मात्र, एका रद्दी विक्रेत्याने सांगितले की, आम्ही १० रुपये किलोने रद्दी खरेदी करीत आहोत. १५ ते १६ रुपये किलोने विकत आहोत. काही जणांनी संधीचा फायदा घेऊन २० ते २५ रुपये किलोपर्यंतही रद्दी विकली. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabadऔरंगाबादMarketबाजार